• 24 Sep, 2023 01:39

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea: इसेंशिअल ऑइलच्या व्यवसायाने दिला अनेकांना रोजगार

Essential Oils Business

Essential Oils Business: नागपूर शहरातील खामला येथे राहणाऱ्या अर्चना अग्रवाल यांनी 2014 मध्ये इसेंशिअल ऑइलचा व्यवसाय सुरु केला. नैसर्गिक सुगंध देणारे, आरोग्यासाठी हितकारक अशा या विविध सुगंधित ऑइल्स व्यवसायच्या माध्यमातून त्यांनी जवळपास 250 ते 300 शेतकऱ्यांच्या हाताला काम दिले आहे. तर शहरातील ऑफिसमध्ये 10 महिलांना रोजगार दिलेला आहे.

Essential Oils Business: आपल्या भारत देशात आरोग्यास लाभदायक, सुंदरता वाढविणारे आणि आपल्या इतरही गरजा पूर्ण करण्याकरीता उपयोगी अशा अनेक वनस्पती आहेत. त्यापैकी बऱ्याच वनस्पती आपल्याला माहिती आहेत. तर काही वनस्पतींचा उपयोग कशा कशा साठी होतो? हे अद्यापही आपल्याला माहिती नाही. मात्र, काही जणांना मुळातच अशा विविध वनस्पतींचा अभ्यास करण्याची आवड असते. विविध प्रकारच्या सुगंधांचे एक आकर्षण असते. अशाच प्रकारची आवड असणाऱ्या अर्चना अग्रवाल यांनी सिट्सस्प्रे अरोमा अॅण्ड सायन्सेस (Citspray Aroma and Sciences) नावाने एक कंपनी सुरु केली.

सिट्रोनेला ऑइल विक्रीने केली सुरुवात

नागपूर शहरातील खामला परिसरात राहणाऱ्या अर्चना अग्रवाल यांचे शिक्षण इंजिनिअर क्षेत्रात झाले आहे. एकदा त्या दुसऱ्या देशात फिरतीवर असताना, त्यांना भारतातील इसेंशिअल ऑइल भेसळयुक्त तयार करुन किती महाग विकल्या जाते, याचा अनुभव आला. त्यानंतर त्यांनी सर्व प्रकारच्या इसेंशिअल ऑइलचे फायदे आणि त्याचा उपयोग कसा होतो? यासंदर्भात अगदी खोलात जाऊन अभ्यास करण्याचा विचार केला. या सर्व गोष्टींवर विविध प्रयोग केलेत. त्यानंतर त्यांनी सिट्रोनेला ऑइल (citronella oil) विक्री पासुन व्यवसायाची सुरुवात केली. हे ऑइल काढण्याकरीता झाडांची लागवड पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या शेतात केली होती.

नैसर्गिक उत्पादनांवर भर

आपण दुसऱ्या देशातील प्रॉडक्टचा वापर करुन आपले आरोग्य आणि जमीन दोन्हीचे नुकसान करीत असतो. त्या ऐवजी आपल्या देशातील इसेंशिअल ऑइलचा वापर केल्यास आपलं आरोग्य उत्तम राहाते आणि जमीनीला देखील काही नुकसान होत नाही, या विचाराने प्रेरीत होऊन अर्चना अग्रवाल यांनी हा व्यवसाय वाढविला. आता त्यांच्याकडे 75 प्रकारचे इसेंशिअल ऑइल, अरोमा आणि सुगंध देणारे ऑइल, डीफ्युजर्स, एअर फ्रेशनर्स, कॉस्मेटिक्स आणि जेल प्रॉडक्ट या सर्व वस्तू विक्री करीता उपलब्ध आहे. सिट्सस्प्रे मध्ये विक्री केल्या जाणाऱ्या कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट मध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स, संरक्षक (preservatives) आणि कलर्स नसतात.

शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळाले

अर्चना या जवळपास 250 ते 300 शेतकऱ्यांना सिट्रोनिला, गुलाब, लेमनग्रास, पामरोझा, तुळस, मोगरा, खस, कोरफड, मोगरा, नागरमोथा, हळद यासारख्या अनेक झाडांच्या रोपट्यांचे वाटप करतात. तीन ते चार महिन्यात हे रोपटे परिपक्व झाले की त्यापासुन ऑइल काढतात. मग त्या संपूर्ण ऑइलचे मिळालेल्या पैशांमधून अर्धे पैसे शेतकऱ्यांना देतात आणि अर्धे स्वत:हा घेतात. झटपट नफा देणाऱ्या या ऑइलमुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो.

महिलांच्या हाताला मिळाला रोजगार

तसेच कंपनीमध्ये आज 10 महिलांना रोजगार देण्यात आला आहे. त्यांना त्यांच्या वेतन बरोबरच प्रॉडक्ट विक्रीवर कमीशन दिल्या जाते. या कमिशनच्या माध्यमातून  महिला 10 हजार ते 1 लाख रुपया पर्यंत वर्षाला नफा मिळवतात.

गुंतवणूक आणि नफा

उद्योजिका अर्चना अग्रवाल यांनी 2014 साली 10 हजार रुपये गुंतवणूक करुन आपल्या व्यवासायाची सुरुवात केली. तर आतापर्यंत या व्यवसायात एकूण कोटी रुपयांच्या जवळपास गुंतवणूक करण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षात अर्चना यांना 5 लाख रुपयांपेक्षा अधिक नफा झाला. तर यावर्षी हा नफा 6 ते 7 लाख रुपयांपेक्षा जास्त पोहचविण्याचा अर्चना यांचा मानस आहे. या व्यवसायमध्ये होलसेल पेक्षा किरकोळ विक्रीमध्ये अधिक नफा असल्याचे अर्चना सांगतात.

असे केले जाते मार्केटिंग

अर्चना यांनी आधी विविध ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या प्रदर्शन मध्ये स्टॉल लावून प्रॉडक्ट विक्री करायच्या. परंतु कोरोना पासुन त्यांनी मार्केटिंग करण्या करीता विविध मार्गांचा अवलंब केला आहे. जसे की, टेलिकॉलिंग, सोशल मिडीया, माऊथ पब्लीसिटी, इकोनॉमिक्स वेबसाइट्स या माध्यमातून त्या मार्केटिंग करतात.