Ice Cream Business: कुंजीर कुटुंबामध्ये जितेंद्र, सचिन आणि नितीन हे तिघे भाऊ आहेत. 2013 पासून कुंजीर कुटुंबाने दुग्धव्यवसाय सुरु केला. त्यानंतर याच दुधापासून कुल्फी तयार करण्याचे निश्चित केले. कुल्फी तयार करतांना बाहेरुन मागवल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांचा दर्जा निकृष्ट असल्याचं जाणवल्याने दुधापासूनचे सर्व पदार्थ स्वत:च तयार करण्याचे कुंजीर कुटुंबीयांनी ठरवले आणि तेव्हापासूनच उद्यास आले चिंतामणी ब्रँड.
Table of contents [Show]
दररोज हजारो लिटर दुध संकलन
कुंजीर कुटुंबीयांनी 2013 पासून दुधाचा व्यवसाय सुरु केला. पुण्यात देखील दुधाची विक्री जोरादर होऊ लागली आहे. दुधाची शुध्दता, गुणवत्ता आणि वितरणातील सातत्य यामुळे या व्यवसायाने ग्राहकांचा विश्वास संपादन केला. सध्या कुंजीर कुटुंबीयांकडे 100 गायी, 50 म्हशी अशी एकूण 200 जनावरे आहेत. यापासून दररोज आठशे ते बाराशे लिटर दुध मिळते.
‘अशी’ झाली व्यवसायाला सुरुवात
2014 मध्ये कुंजीर कुटुंबातील तिन्ही मुलांनी दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया याविषयाशी संबंधित प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) अंतर्गत 1 कोटी रुपयांचं कर्ज काढलं. यावर त्यांना 35 % सबसिडी मिळाली. या पैशांच्या माध्यमातून त्यांनी विविध यंत्रे विकत घेतली. त्यानंतर एक आउटलेट सुरु केले. या आउटलेटच्या माध्यमातून 500 लीटर दुधाची विक्री केली जाते. त्यानंतर उरलेल्या दुधाचे पनीर, तूप, बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड, खवा, कुल्फी, लस्सी, इत्यादी पदार्थ तयार केले जाते. गरज भासल्यास अतिरिक्त दुध गावातील विश्वासू व्यक्तींकडून घेतल्या जाते.
कुल्फीची प्रचंड मागणी
चिंतामणी ब्रँडचा कुल्फी हा सर्वात लोकप्रिय झालेला पदार्थ आहे. ऑफ सिझन मध्ये 15 हजार कुल्फींची विक्री होते. तर सिझन मध्ये दिवसाला 40 हजार कुल्फींची विक्री होत असल्याची माहिती जितेंद्र कुंजीर यांनी दिली. कुल्फी आणि दुधापासून निर्मित संपूर्ण पदार्थांपासून महिन्याला 5 लाख रुपयांचा नफा होतो. मात्र, भेसळयुक्त दुग्ध पदार्थ कमी किमतीत विकले जात असल्याने ग्राहकांचा विश्वास संपादन होई पर्यंत अथक परिश्रम घेणे आणि व्यवसायात सातत्य ठेवणे, हेच या व्यवासायातील यशाचे गमक आहे.
अनेकांना मिळाला रोजगार
तसेच कुंजीर कुटुंबीयांनी अथक परिश्रमातून पैसा उभा करुन 10 एकर शेती घेतली. यामध्ये डाळींब आणि सिताफळ या फळांची शेती केली जाते. यामाध्यमातून वर्षाला 10 ते 12 लाख रुपयांचा नफा मिळतो. आज कुंजीर कुटुंबीयांमुळे 40 नागरिकांना रोजगार प्राप्त झाला आहे.