Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Farming Idea: तंत्रज्ञानयुक्त शेतीची कास धरल्याने मिळतो लाखोंचा नफा, अमरावतीच्या युवकाचा यशस्वी प्रयोग

Farming Idea

Business Idea: अमरावती जिल्ह्यातील उमरखेड येथे राहणारा शाश्वत मुंडा हा उच्चशिक्षित तरुण शेतीमध्ये हस्त पद्धतीने परागीभवन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन यशस्वीपणे शेती करीत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने प्रत्येक फळाचे आणि भाजीपाल्याचे एका एकरामधून शेकडो टन उत्पन्न घेणे शक्य झाले आहे.

Technological Agriculture: अनेक उच्चशिक्षित तरुण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करीत आहेत. या यादीत आता विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील उमरखेड येथे राहणाऱ्या मुंदडा परिवाराचे नाव देखील सहभागी झाले आहे. सुमारे 40 वर्षांपासून मुंदडा परिवार शेती करीत आहेत. आधी त्यांच्याकडे 100 एकर शेती होती. त्यानंतर आणखी काही शेती खरेदी करण्यात आली. आता त्यांच्याकडे एकूण 148 एकर शेती आहे आणि एक प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

शेतीला दिले व्यवसायाचे स्वरुप

आधी प्रफुल्ल मुंदडा हे शेती सांभाळत असे. आता त्यांचा मुलगा शाश्वत मुंदडा हा शेती सांभाळतो. शाश्वत हा एक उच्चशिक्षित तरुण आहे. त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर अॅग्रीकल्चर मध्ये एमबीए आणि अर्थशास्त्र विषयात एम. ए असे शिक्षण पूर्ण केले आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही शाश्वत याने नोकरी किंवा इतर कुठलाही व्यवसाय करण्याऐवजी घरच्या शेतीलाच व्यावसायिक करण्याचा निर्णय घेतला.

'या' पिकांची लागवड केली जाते

शाश्वतने 40 एकर मध्ये भरताचे आणि भाजीचे वांगे यांची लागवड केली आहे. 12 एकर मध्ये टमाटरचं उत्पन्न घेतले आहे. 18 एकर मध्ये पपईची लागवड केली आहे. 11 एकर मध्ये पेरुची लागवड केली आहे. तर 4 एकर मध्ये अॅपल बोराचे उत्पन्न घेतले आहे. तसेच 45 एकर मध्ये तूर आणि कापसाची लागवड केली आहे.

सीताफळाची लागवड

शाश्वतने भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने विकसित केलेल्या अर्का सहान या सीताफळ वाणाची लागवड केली आहे. त्याने या वाणाची 1700 झाडे लावली आहेत. यात परागीभवनाती प्रक्रिया सकाळी 6 ते 9 या कालावधीत मॅन्युअल पद्धतीने केली जाते. यामुळे फळधारणा चांगली आणि लवकर होते. या सिताफळाची 75 रुपये किलोने विक्री केली जाते.

पेरुची लागवड

पेरुची लागवड 12 बाय 8 फुटांवर केली जाते. एका एकरला सिताफळाची 450 झाडे लावली आहेत. प्रत्येक झाडापासून 30 ते 35 किलो माल मिळतो. तसेच एका एकरला 14 ते 15 टनपर्यंत उत्पन्न मिळते. पेरु 40 ते 50 रुपये किलो प्रमाणे विकल्या जातो.

वांग्याची लागवड

भरताची आणि भाजीची वांगी मिळून एका एकरला 50 ते 60 हजार किलो उत्पन्न मिळते. तसेच खायला ही वांगी प्रचंड चविष्ट असल्याने त्याला मागणी देखील तशीच आहे. तसेच टमाटरचे उत्पन्न एका एकरला दीड ते 2 हजार रुपये किलोने विक्री केल्या जाते.

विक्री कशी केली जाते

पेरु, वांगी, सिताफळ, पपई, इत्यादी माल उडीसा, हैद्राबाद, गोंदिया, नागपूर येथे पाठविला जातो. तसेच अनेक ट्रेडर्स आणि व्यापारी बराच माल थेट शेतामधूनच घेऊन जातात.

लाखोंचा नफा

शाश्वत मुंदडा या युवकाने शास्त्रीय आणि आधुनिक लागवड पद्धतीने फळबाग विकसित केली आहे. यासाठी त्याने अथक परिश्रम घेतले. देशातील आधुनिक तंत्रज्ञान, संस्थांशी भेट घेतली  आणि सुधारित वाणांची निवड केली. त्यामुळे आज त्याच्या शेतात उच्च गुणवत्ता आणि उत्पादकता यांचे मिश्रित फळ चाखायला मिळते. प्रत्येक फळ आणि भाजीपाला यांच्या माध्यमातून शाश्वतला वर्षाला लाखो रुपयांचा नफा होतो.