Budget 2023: देशात नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचा आधार पोस्ट ऑफिसच्या योजनेलादेखील मिळाला. पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजनेची मर्यादा वाढविण्यात आले असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी दिली. त्यामुळे नागरिकांना या योजनेचा मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
किती वाढविली मर्यादा (How much Increased Limit)
पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजनेची मर्यादा वाढविली असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात स्पष्ट केले. ही मर्यादा त्यांनी सिंगल खाते धारकांसाठी जी 4.5 लाख रूपये होती, ती 9 लाख रूपये केली आहे. तसेच जाॅइट खातेधारकासाठी जी 9 लाख रूपये होती, ती 15 लाख रूपये करण्यात आली आहे. म्हणजेच आता तुम्ही सिंगल खात्यात 9 लाख रूपये, जाॅइट खात्यात 15 लाख रूपयांची गुंतवणूक करून दर महिन्याला 10 हजार रूपये मिळवू शकता.
5 वर्षात मिळणार मॅच्युरिटी (Maturity in 5 Years)
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा 5 वर्षांचा आहे, या पाच वर्षानंतर तुम्ही नवीन व्याजदराने देखील कमाई करून शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला एफडीच्या तुलनेत सर्वोत्तम परतावा प्राप्त होतो. जर तुम्ही मासिक पैसे काढून घेतले नाही तर, तर ती रक्कम पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात राहील व तुम्हाला ती रक्कम मुळ रकमेत अॅड होऊन पुढील व्याज मिळत जाईल.
कमाईची सुवर्णसंधी (A Golden Opportunity to Earn)
पोस्ट ऑफिसची ही मासिक उत्पन्न योजना (POMIS) म्हणजेच लघु बचत योजना ही गुंतवणूक करणाऱ्या लोकांना कमाई करण्याची सुवर्णसंधी देत आहे. या योजनेमध्ये तुम्ही ठराविक रक्कमची गुंतवणूक करून दरमहा उत्पन्न मिळ शकते. येथे तुमची ही गुंतवणूक सुरक्षित राहील. तसेच तुम्ही ही रक्कम पाच वर्षानंतरदेखील काढू शकता. यामध्ये सिंघल व जाॅइंट खात्यांचीदेखील सुविधा उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही सिंगल खात्यात 9 लाख रूपये, जाॅइट खात्यात 15 लाख रूपयांची गुंतवणूक करू शकता.