Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Britannia Industries Market Cap: ब्रिटानियाचा शेअर उच्चांकावर, मार्केट कॅप 1 लाख कोटींवर गेली, आता गुंतवणूक करावी का?

Britannia Industries Ltd  Share Price, Britannia Industries  , Market Cap, Investment

Britannia Industries Market Cap: शेअर बाजारात सोमवारी ब्रिटानियाच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.कंपनीची तिमाहीत कामगिरी दमदार झाल्याने गुंतवणूकदारांकडून ब्रिटानियाच्या शेअरची खरेदी केली.ब्रिटानियाचा शेअर 4000 रुपयांच्या आसपास असल्याने किरकोळ गुंतवणूकादारांनी या पातळीवर तो खरेदी करावा का, याबाबत ब्रोकर्स काय सांगतात ते जाणून घेऊया.

बिस्किट्स उत्पादनातील आघाडीची कंपनी ब्रिटानियाने शेअर मार्केटमध्ये नवा विक्रम केला आहे. ब्रिटानियाच्या शेअर सोमवारच्या सत्रात 4178.25 रुपयांच्या ऑल टाईम हाय प्राईसवर गेला. 
(Britannia Industries Ltd Share touches all time high) कालच्या सत्रात शेअरच्या किंमतीत 10% वाढ झाली. यामुळे ब्रिटानियाचे बाजार भांडवलाने (Market Cap touches 1 lakh crore mark) एक लाख कोटी रुपयांची पातळी गाठली होती. ब्रिटानियाचा शेअर 4000 रुपयांच्या आसपास असल्याने किरकोळ गुंतवणूकादारांनी या पातळीवर तो खरेदी करावा का, याबाबत ब्रोकर्स काय सांगतात ते जाणून घेऊया.  

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ब्रिटानियाला 490.58 कोटींचा प्रॉफिट झाला आहे. कंपनीच्या नफ्यात यंदा दुसऱ्या तिमाहीत 28.4% वाढ झाली.त्याशिवाय कंपनीच्या महसुलात देखील घसघशीत वाढ झाली आहे. ब्रिटानियाच्या एकूण महसुलात 21% वाढ झाली आहे. कंपनीला दुसऱ्या तिमाहीत 4379.61 कोटींचे उत्पन्न मिळाले.

कंपनी मार्केटमध्ये सुस्थितीत आहे. वितरण व्यवस्था मजबूत आणि व्यापक करण्याला कंपनीने प्राधान्य दिले असल्याचे ब्रिटानियाचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मागील 38 तिमाहींमध्ये कंपनीने सातत्याने वृद्धी नोंदवली आहे.दुसऱ्या तिमाहीतील महसूल हा आतापर्यंतचा कंपनीला मिळालेला सर्वाधिक महसूल असल्याचे बेरी यांनी सांगितले.  

या दमदार कामगिरीचे पडसाद कंपनीच्या शेअरवर उमटले. ब्रिटानियाच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. सोमवारी शेअर मार्केट सुरु होताच ब्रिटानियाच्या शेअरची मागणी वाढली. सोमवारी सकाळी 9.30 वाजता Britannia Industries चा शेअर 4175.90 रुपयांवर पोहोचला. शेअरमध्ये 9.85% वाढ झाली होती. कालच्या इंट्रा डेमध्ये ब्रिटानियाने 4178.25 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला होता.  

britannia-shares-live-bse.jpg

ब्रिटानिया शेअरमध्ये आता गुंतवणूक करावी का? Should you Invest in a Bite of Britannia?

  1. ब्रिटानियाच्या शेअरने सार्वकालीन उच्चांक गाठल्याने हा शेअर किरकोळ गुंतवणूकदारांच्या हाताबाहेर गेला आहे. मात्र मागील काही सत्रांमध्ये या शेअरमध्ये सातत्याने तेजी दिसून आली आहे.ब्रिटानिया खाद्यपदार्थांमध्ये विस्तार करत आहे. ही एक मोठी कंपनी असून मागील तीन वर्षांपासून दमदार कामगिरी करत आहे.
  2. ICICI Securities ब्रिटानियाबाबत सकारात्मक अंदाज वर्तवला आहे.ICICI Securities ने ब्रिटानियासाठी 4300 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. अनेक नवीन प्रोडक्ट्स लॉंचिंगच्या प्रक्रियेत आहेत.मागणी आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांची रेंज पाहता कंपनीसाठी नजीकचा काळ चांगला राहला राहील.त्यामुळे गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.
  3. Macquarie या ब्रोकर संस्थेने ब्रिटानियाबाबत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या उत्पादन खर्चावर दबाव आहे. दुसऱ्या तिमाहीत कामगिरी उंचावली असली तरी दुसऱ्या बाजुला कंपनीवरील कर्जाचा बोजा देखील वाढला असल्याचे Macquarie ने आपल्या रिसर्च रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ब्रिटानियाचा शेअर 3750 रुपयांपर्यंत खाली घसरु शकतो, असा अंदाज Macquarie ने व्यक्त केला आहे.
  4. गोल्डमन सॅक्सने सुद्धा ब्रिटानियाच्या शेअरबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे. (Goldman Sachs has a neutral call) कंपनीच्या महसुलात 21% वाढ झाली आहे. ब्रिटानियाचा शेअरसाठी 4000 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे.