Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BPCL ची Ather Energy सोबत भागीदारी, भारतात 21 हजार ठिकाणी EV चार्जिंगसाठी मिळणार जागा

BPCL Partnership With Ather Energy

Image Source : www.indiainfrahub.com

BPCL Partnership With Ather Energy: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) इलेक्ट्रिक वाहन कंपनी Ather Energy सोबत भागीदारी करार केला आहे. देशातील इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग नेटवर्क मजबूत आणि विस्तारित करण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. BPCL आपल्या देशभरातील 21,000 हून अधिक स्टेशनवर अथर कंपनीला चार्जिंग ग्रिड स्टेशन उभारण्यास जागा उपलब्ध करुन देणार आहे.

EV Charging Stations In India:  Ather Energy कंपनीचे सध्या देशातील 100 शहारांमध्ये 1400 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आहे. त्यामुळे आता भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत केलेली भागीदारी एथर ग्रिडच्या विस्ताराला गती देण्यास मदत करेल. तर BPCL आणि  Ather Energy च्या या भागीदारीचा फायदा Ather Electric स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकाला होईल.

2023 मध्ये उभारणार 100 चार्जिंग स्टेशन

BPCL सोबत केलेल्या या भागीदारीने अथर एनर्जीला त्याच्या वाहन विक्रीमध्ये देखील फायदा होईल. कारण ग्राहक ज्या गाड्यांचे चार्जिंग स्टेशन सहज उपलब्ध आहेत, त्याच कंपनीचे इलेक्ट्रीक  वाहन खरेदी करण्यास प्राधान्य देतील. त्यामुळे अथर कंपनीला मेट्रो सिटी मध्ये देखील आपले नेटवर्क मजबूत करण्याची संधी मिळत आहे. सध्या अथरचे दिल्ली एनसीआर मधील विविध ठिकाणी चार चार्जिंग स्टेशन आहे. तर डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण भारतातील BPCL च्या जागेवर 100 हून अधिक फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्याचे उद्दीष्ट आहे.

BPCL  चा निर्णय कौतुकास्पद

देशात स्वच्छ ऊर्जा पर्यायांचा अवलंब करण्यास BPCL आघाडीवर आहे. काळाची गरज आणि सरकारचे भविष्यातील धोरण लक्षात घेऊन BPCL ची ही वाटचाल कौतुकास्पद आहे. BPCL 2040 पर्यंत पूर्णत: शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या राष्ट्राच्या विचारसरणीला अनुसरुन कार्य करीत आहे. तसेच BPCL च्या 7000 पेट्रोल पंपांचे रुपांतरण इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन मध्ये करण्याकरीता काम सुरु करण्यात आले आहे.