Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BMW Bikes Launched India: BMW M 1000 RR मॉडेल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

BMW Bikes Launched India

Image Source : www.cycleworld.com

BMW Bikes Launched India: प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या कंपनी आपल्या बाइक लाँच करीत असतात. आता BMW कंपनी ने आपली नवीन M 1000 RR भारतात लॉन्च केली आहे. बीएमडब्ल्यू कंपनीने या मॉडेलचे दोन व्हेरियंट भारतात लॉन्च केले आहेत. कंपनी नोव्हेंबर 2023 पासून या बाइक्सची डिलिव्हरी करणार आहे.

BMW M 1000 RR Model Price: BMW कंपनी आपल्या दमदार कार आणि बाइक्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहे. कंपनी सतत आपली अनेक उत्पादने बाजारात आणत असते. याचअंतर्गत, BMW कंपनीने आपली नवीन M 1000 RR भारतात लॉन्च केली आहे. बीएमडब्ल्यू कंपनीने या मॉडेलचे दोन व्हेरियंट भारतात लॉन्च केले आहेत. कंपनी नोव्हेंबर 2023 पासून या बाइक्सची डिलिव्हरी करणार आहे.

पॉवरफुल इंजिन

बाइकचा वेग वाढवण्याचे काम इंजिन करते. BMW कंपनीने आपल्या नवीन M 1000 RR मॉडेलमध्ये 999cc चे इंजिन दिले आहे, जे 4-सिलेंडर वॉटर-कूल्ड इनलाइन इंजिन आहे. ज्यामध्ये 14500 rpm वर 212 HP BHP पॉवर जनरेट करण्याची क्षमता आहे. 11000 rpm वर जास्तीत जास्त 113 Nm टॉर्क जनरेट करू शकतो. कंपनीने या बाइकमध्ये पाच राइडिंग मोड दिले आहेत. बाइकचा टॉप स्पीड 314 किमी प्रतितास आहे.

सेफ्टी लक्षात घेऊन फीचर्स

बाईक चालवताना ड्रायव्हरची सुरक्षितता लक्षात घेऊन बीएमडब्ल्यू कंपनीने आपल्या M 1000 RR मॉडेलमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देखील दिले आहेत. यामध्ये कंपनीने प्रामुख्याने डिस्क ब्रेक सुविधा, एबीएस, व्हीली कंट्रोल, दोन्ही चाकांमध्ये लॉन्च कंट्रोलसह ट्रॅक्शन कंट्रोलचा समावेश केला आहे. बाईकमध्ये दिलेल्या इतर काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, नवीन BMW M 1000 RR मध्ये शक्तिशाली एलईडी लाईट युनिट, इलेक्ट्रॉनिक क्रूझ कंट्रोल, हीटेड ग्रिप्स, रियर यूएसबी चार्जिंग सॉकेट, हलके वजन आणि बॅटरी, 6.5 इंच TFT डिस्प्ले आहे.

बाइक्सच्या किंमती

BMW M 1000 RR स्टैंडर्ड वेरिएंट ग्राहकाला सुमारे 49 लाख रुपये मोजावे लागतील. तर BMW M 1000 RR कॉम्पिटीशन वेरिएंट खरेदीदाराला 55 लाख रुपये द्यावे लागतील.