आलिशान कार निर्मिती करणाऱ्या BMW कंपनीने आपली बहुप्रतिक्षित BMW X1 ही कार आज भारतात लाँच केली. या कारमध्ये कंपनीने अशी फिचर्स दिली आहेत, ज्याची भुरळ सर्वांना पडेल. पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये ही कार भारतात लाँच करण्यात आली आहे. स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी व्हेइकल (SAV) गाडी मजबूत आणि स्टायलिश असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
BMW X1 कारची किंमत (BMW X1 price in India)
ही कार भारतातील चेन्नई येथील BMW प्लँटमध्ये तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ही कार पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे. पेट्रोल व्हर्जनमधील गाडीची किंमत 45,90,000 असून डिझेल व्हर्जनची किंमत 47,90,000 रुपये आहे. कंपनीच्या डिलरशिप नेटवर्क आणि वेबसाइटवरून ही गाडी बुक करता येईल. मार्चपासून पुढे डिझेल गाड्यांची डिलिव्हरी ग्राहकांना मिळेल तर जूनपासून पेट्रोल व्हर्जन गाड्यांची डिलिव्हरी सुरू होईल.
BMW X1 या गाडीचा स्टायलिश लूक असून यामध्ये अनेक हायफाय फिचर्स देण्यात आले आहेत. गाडीची डिझाइनही एकदम मजबूत आहे. गाडीचे इंडिरियर मॉडर्न आणि डिजिटल बनवण्यात आले आहे. ही गाडी BMW च्या खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असे कंपनीचे प्रेसिडेंट विक्रम पहावा यांनी म्हटले आहे.
काय आहेत फिचर्स? (BMW X1 features)
BMW X1 luxury SAV गाडीमध्ये अॅडाप्टिव्ह LED Headlights हाय बीम असिस्टंटसह देण्यात आले आहेत. BMW लाइव्ह कॉकपीट प्लस आणि Curved Display गाडीत देण्यात आला आहे. माय बीएमडब्ल्यू अॅप, रिमोट फंक्शन्स, डिजिटल की प्लस विथ कंम्फर्ट अॅक्सेस, पार्किंग आमि रिव्हर्स घेताना असिस्टंट सुविधा, अॅक्टिव्ह सीट, Instrument Panel Luxury आणि हर्मन या कंपनीची ऑडिओ सिस्टिम देण्यात आली आहे.
BMW X1 डिझेल व्हेरियंट 0 ते 100 किलोमिटर प्रतितास फक्त 8.9 सेकंदात जाते तर BMW X1 (petrol) 0 ते 100 किलोमीटर प्रतितास फक्त 9.2 सेकंदात जाते, असा दावा कंपनीने केला आहे.