Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BMW i Vision Dee : जाणून घ्या, बीएमडब्ल्यूने तयार केली रंग बदलणारी कार

BMW i Vision Dee

Image Source : http://www.ndtv.com/

BMW i Vision Dee : जर्मन लग्झरी वाहन निर्माती असलेली कंपनी बीएमडब्ल्यूने एक भन्नाट कार तयार केली आहे. ही कार सीईएस टेक्नोलॉजीसह बनविण्यात आली आहे. या टेक्नोलॉजीसह खासियत म्हणजे आता BMW i Vision Dee ही गाडी रंग बदलणारी आहे, या गाडीविषयी अधिक जाणून घेऊयात.

BMW i Vision Dee: सध्या बाजारात विविध गाडया लॉन्च होत आहेत. हे स्पर्धेचे युग असल्याने, प्रत्येक कंपनी आपले शंभर टक्के देऊन हटके माॅडेल कसे बाजारात येईल, याचा कस लावते. अशातच आता जर्मन लग्झरी वाहन निर्माती असलेली कंपनी बीएमडब्ल्यूने एक भन्नाट कार तयार केली आहे.  ही कार सीईएस टेक्नोलॉजीसह बनविण्यात आली आहे. या टेक्नोलॉजीची खासियत म्हणजे आता BMW i Vision Dee ही गाडी रंग बदलणार आहे. बाजारात पहिल्यांदा अशी गाडी  लॉन्च होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी असे आश्चर्य कधीच पाहिले नाही. त मग अशा आगळया-वेगळया गाडीबाबत जाणून घेऊयात.

BMW i Vision Dee गाडीबाबत (About BMW i Vision Dee)

BMW i Vision Dee ही कार लास वेगासमध्ये सुरू असलेल्या कन्झ्यूमर इलेक्ट्रॉनिक शोदरम्यान सादर केली आहे. ही कार इलेक्ट्रिक स्पोर्ट सेडान असून तिला फ्यूचर मोबिलिटीदेखील म्हटले जाते. कंपनीने दावा केला की, ही कार रंग तर बदलणारच सोबतच तुमच्याशी गप्पादेखील मारणार आहे.

32 रंगांचे पर्याय (32 Color Options)

विशेष म्हणजे ही कार तुम्ही कमांड दिल्यानंतर एक-दोन नव्हे तर तब्बल 32 रंग बदलणार असल्याचा, कंपनीने दावा केला आहे.

कारमध्ये काय खासियत (What is Special about the Car)

BMW ही कॉन्सेप्ट कार यूएस बेस्ड ई इन्क कॉर्पोरेशनद्वारे विकसित करण्यात आलेल्या टेक्नोलॉजीचा वापर करते. हे तंत्रज्ञान ई-रीडर आणि वेगवेगळ्या स्मार्टवॉचमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. कारवर एका फिल्म कोटिंमध्ये छोटे मायक्रो कॅप्स्यूल्सदेखील देण्यात आले असून, ज्यांचे पिगमेंट्स इलेक्ट्रिसिटी सप्लाय होताच रंग बदलण्यास सुरू होते. ही ऑटोमोटिव्ह क्षेत्रातली शानदार टेक्नोलॉजी आहे. हे खास तंत्रज्ञान इन हाऊस इंजिनियर्सकडून तयार करून घेण्यात आले आहे. ई-पेपर सेगमेंटचा वापर हा चाक आणि ग्रिलव करण्यात आला आहे. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील समावेश केला असल्याचे, बीएमडब्ल्यू कंपनीचे म्हणणे आहे.