बंगळुरु विमानतळाची सफर आता व्हर्च्युअली करता येणार आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने मंगळवारी 'BLR Metaport' ह्या पहिल्या फेजची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना www.blrmetaport.com वेबसाइटवर लॉगइन करुन संपूर्ण विमानतळाची आभासी पद्धतीने सफर करता येणार आहे. विमानतळावरील T2 आभासी पद्धतीने नागरिकांना पाहता येणार आहे. मेटाव्हर्सचा अनुभव देणारा टर्मनिल-2 हा जगातील पहिला टर्मिनल ठरला आहे.
अॅमेझॉन वेबसर्व्हिस कंपनीची मदत (Help of AWS company to build metaport)
अॅमेझॉन वेबसर्व्हिसेस आणि पॉलिगॉन कंपन्यांची मदत घेऊन हा मेटाव्हर्सचा अनुभव तयार करण्यात आला आहे. इमर्सिव मोडमध्ये आणि 3-D पद्धतीने विमानतळाची सफर करता येणार आहे. इच्छुक प्रवासी आणि नागरिक www.blrmetaport.com या संकेतस्थळावर लॉग इन करुन T-2 आभासी पद्धतीने पाहू शकतात. तुमची कॉम्प्युटरवर ज्या प्रकारे गेम खेळता त्या पद्धतीने टर्मिनल दोनचा फेरफटका मारु शकता. शॉपिंग, चेकइन, फुडमॉल ओपन स्पेस एरिया या सगळ्या ठिकाणी तुम्ही व्हर्च्युअली जाऊ शकता.
विमानतळाची आभासी दुनियेतून सफर( experience Metaverse of Airport)
मेटाव्हर्सवरचा अनुभव देणारी सुविधा निर्माण करण्याचे एप्रिल २०२२ मध्ये ठरवण्यात आले होते. एव्हिएशन क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापरण्याचाही प्रयत्न होत आहे. जगभरामध्ये अद्याप अशा पद्धतीचे कोणतेही विमानतळ नाही. बंगळुरु विमानतळ हे आभासी दुनियेचा वापर करणारे पहिले विमानतळ ठरले आहे.
एव्हिएशन क्षेत्रात वेब-3 चा वापर (Use of Web3)
हा व्हर्च्युअल अनुभव तयार करण्यासाठी पॉलिगॉन ब्लॉकचैनचा वापर करण्यात आला होता. बंगळुरु विमानतळाच्या चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर म्हणाल्या की, नॉन फंजिबल टोकन (NFT) आणि वेब-३ तंत्रज्ञान वापरण्याचा हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. प्रवाशांना आणि सर्वसामान्य नागरिकांना आगळावेगळा व्हर्च्युअल अनुभव मिळवण्यासाठी हे काम केल्याचे त्या म्हणाल्या.