जगातील सर्वात मोठा क्रिप्टो एक्सचेंज असलेल्या बायनान्सने USDC कॉइन्समधील गुंतवणूक काढण्यावर निर्बंध घातले आहेत.(Binance Holdings temporarily paused withdrawals of USDC) मागील काही दिवसांत USDC मधून क्रिप्टो गुंतवणूकदारांन प्रचंड प्रमाणात पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे पैसे काढण्यावर निर्बंध घातल्याचे बायनान्सचे सीईओ चँगपेंग झाओ यांनी म्हटले आहे. दरम्यान, बायनान्सच्या या निर्णयाने क्रिप्टो गुंतवणूकदार मात्र धास्तावले आहेत. FTX दिवाळखोरीत गेल्यानंतर गुंतवणूकदारांवर पैसे काढण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे आताही बायनान्सच्या या निर्णयाने गुंतणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बायनान्सचे सीईओ चँगपेंग झाओ यांनी ट्विटरवर याबाबत अपडेट दिली आहे. झाओ ट्विटमध्ये म्हणतात की USDC मधून मागील काही दिवसांत पैसे काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. USDC आणि इतर दोन क्रिप्टो कॉइन्स Paxos Standard आणि Binance USD हे USDC चे स्टेबलकॉइन्स आहेत. यामधील गुंतवणूक काढून घेण्यासाठी डॉलर्स किंवा पारंपारिक चलनाची आवश्यकता आहे.मात्र काही ठिकाणी होत नसल्याने बायनान्सने पैसे काढण्यावर निर्बंध लागू केल्याचे म्हटले आहे.
USDC चे मूल्य 1 डॉलर इतके आहे.जेव्हा क्रिप्टो मार्केटमध्ये प्रचंड अस्थिरता असते तेव्हा क्रिप्टो ट्रेडर्स USDC कॉइन्समध्ये रोख रक्कम गुंतवून ठेवतात.मात्र या निर्बंधांचे पडसाद Binance कॉइनवर उमटले. मंगळवारी क्रिप्टो मार्केट Binance Coin च्या किंमतीत 5.12% घसरण झाल्याचे दिसून आले होते. Binance Coin चा भाव 269 डॉलर इतका होता.
मागील 24 तासांत गुंतवणूकदारांनी USDC कॉइन्समधून 2 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक काढून घेतली आहे. या कॉइन्सच्या भवितव्यबाबत गुंतवणूकदार साशंक आहेत. त्यामुळे यातून पैसे काढून घेण्याचा ओघ प्रचंड आहे. Paxos Standard आणि Binance USD यातून गुंतवणूक काढून घेण्यासाठी न्यूयॉर्क बँकेकडील पारंपारिक चलनांची अवश्यकता आहे.(traditional fiat currency issue by New York Bank) ही बँक सुरु झाल्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल, असे झाओ यांनी सांगितले.
बायनान्स एक्सचेंज अमेरिकी तपास यंत्रणांच्या रडारवर
FTX दिवाळखोरीप्रकरणी अमेरिकी तपास यंत्रणांच्या रडारवर बायनान्स एक्सचेंज देखील आहे. बायनान्सने FTX मध्ये गुंतवणूक केली होती. तसेच जेव्हा FTX आर्थिक संकटात सापडला होता तेव्हा बायनान्सचे त्याला बाहेर काढण्यासाठी आवश्यक आर्थिक मदतीची तयारी दर्शवली होती मात्र ऐनवेळी बायनान्सचे सीईओ झाओ यांनी नकार दिला. ज्यानंतर अखेर FTX चा डोलारा कोसळला होता.