Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bikaji Foods IPO Details: बिकाजी फुड्सचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, जाणून घ्या सविस्तर

Bikaji Food's IPO, IPO Price

Image Source : https://www.bikaji.com

Bikaji Foods IPO : बिकाजी फूड्सच्या IPO साठी किंमत पट्टा 285 ते 300 रुपये पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. 16 नोव्हेंबर 2022 रोजी बिकाजी फुड्स स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होईल. गुंतवणूकदारांना 11 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर्सचे वाटप होणार आहे. आयपीओच्या (IPO) माध्यमातून 800 ते 900 कोटी रुपये उभारण्याचा बिकाजी कंपनी प्रवर्तकांचा प्रयत्न आहे.

बिकाजी ही भारतातील तिसर्‍या क्रमांकाची स्‍नॅक बनवणारी कंपनी असून परदेशातही कंपनीने आपला ठसा उमटवला आहे. बिकाजी फूड्स इंटरनॅशनलचा IPO आज म्हणजेच 3 नोव्हेंबर 2022 पासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला. 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत गुंतवणूकदारांना IPO मध्ये गुंतवणूक करता येणार आहे. बोली लावण्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत हा इश्यू सुमारे 21 टक्के सबस्क्राईब झाला.

बिकाजी फूड्सच्या IPO साठी किंमत पट्टा 285 ते 300 रुपये पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. 16 नोव्हेंबर 2022 रोजी बिकाजी फुड्स स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होईल. गुंतवणूकदारांना 11 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर्सचे वाटप होणार आहे. आयपीओच्या (IPO) माध्यमातून 800 ते 900 कोटी रुपये उभारण्याचा बिकाजी कंपनी प्रवर्तकांचा प्रयत्न आहे. आज सकाळी 10 वाजता सब्स्क्रिप्शन साठी बिकाजीचा आयपीओ उघडण्यात आला. बोली लावण्याच्या पहिल्या दिवशी दुपारी 12:06 वाजेपर्यंत सुमारे 21 टक्के सब्स्क्रिप्शनची नोंद झाली. कंपनीचे प्रवर्तक ऑफर फॉर सेल अंतर्गत 2.94 कोटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर आणणार आहेत.

अँकर गुंतवणूकदारांना 87.37 लाख शेअर्सचे वाटप (Bikaji Issue 87.37 lakh shares) 

बीकाजी फूड्सच्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये किमान 50 शेअर्ससाठी बोली लावावी लागेल.अशा प्रकारे किरकोळ गुंतवणूकदाराला या इश्यूमध्ये एकूण 15,000 रुपये (50 शेअर्स x 300 रुपये) गुंतवावे लागणार आहेत. आयपीओ उघडण्यापूर्वी कालपर्यंत अँकर गुंतवणूकदारांकडून बिकाजी फूड्सने 262.11 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांना प्रति शेअर 300 रुपये दराने शेअर्सचे वाटप करण्यात आले असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.  कंपनी आयपीओमधून जवळपास ८३७ कोटींचे भांडवल उभारणार आहे. एकूण 2.93 कोटी शेअर्स इश्यू केले जाणार आहेत.  

बिकाजी फूड्स (About Bikaji Food's)

चटपटीत तयार खाद्यपदार्थ (नमकीन) विक्रीत नावारूपाला आलेली कंपनी म्हणून बिकाजी फुड्सची ओळख आहे. आयपीओ मार्केटमध्ये बिकाजी कंपनीची ओळख हीच तिची ताकद आहे. उत्तर भारतापासून ते ईशान्येपर्यंत सर्व प्रकारच्या नमकीन प्रकारात बिकाजी अग्रेसर आहे. भुजिया, नमकीन, पॅक्ड मिठाईपासून ते पापडचे प्रकार हे कंपनीच्या उत्पादनाच्या रेंजमध्ये असून फ्रोझन फूड आणि कुकीजही कंपनी तयार करते. कंपनीकडे चांगले वितरण नेटवर्क आहे आणि कंपनी एफएमसीजी क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे.

बिकाजी फुड्सची आर्थिक कामगिरी (Financial Records)

बिकाजी फुड्सने आर्थिक वर्ष 2022-2022 या दरम्यान वार्षिक 22.44% वाढ नोंदवली आहे. या दोन वर्षात कंपनीला 1610 कोटींचा महसूल मिळाला. दोन वर्षात कंपनीला अनुक्रमे 76 कोटी आणि 139 कोटींचा नफा मिळाला. चालू आर्थिक वर्षातील जून 2022 च्या तिमाहीअखेर बिकाजी फुड्सने 21 देशांत मालाची निर्यात केली. कंपनीच्या एकूण विक्रीत निर्यातीचे प्रमाण 3.2% इतके आहे. एकूण विक्रीत भुजिया आणि नमकीन या दोन  खाद्यपदार्थांचा 70% वाटा आहे. त्याखालोखाल पॅकेज स्वीट्सचा 13% वाटा आहे. 

प्रवर्तकांकडे मोठा हिस्सा

बिकाजी फुड्सचे मुख्य प्रवर्तक शिव अगरवाल आणि त्यांचा मुलगा दिपक अगरवाल, शिव रतन अगरवाल (HUF), दिपक अगरवाल (HUF) यांच्याकडे 76.50% शेअर्स आहेत. शेअर होल्डिंगमध्ये मोठा हिस्सा अगरवाल कुटुंबाकडे आहे.