इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशननं (Indian Railway Catering and Tourism Corporation) आपल्या सर्व यूझर्सना बनावट अँड्रॉइड (Android) अॅप आणि वेबसाइटबद्दल सावधानतेचा इशारा दिलाय. सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या मते, अॅप आणि वेबसाइट या बनावट आहेत. या दोन्हीच्या माध्यमातून यूझर्सचा संवेदनशील डेटा चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठीच ते तयार केले गेले आहेत. हे बनावट अॅप आणि बनावट वेबसाइट मूळ आयआरसीटीसी वेबसाइट आणि अॅपसारखंच दिसतं. यामुळे यूझर्सला खरं आणि बनावट यातला फरक लक्षात येत नाही. फायनान्शिअल एक्स्प्रेसनं यासंबंधीचं वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
काय आहे बनावट अॅप?
आयआरसीटीसी हे बनावट अॅप ‘irctcconnect.apk’ म्हणून डिस्प्ले होतं. टेलीग्राम आणि व्हाट्सअॅप यासारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे शेअर करून व्हायरल केलं जातंय. स्कॅमर बनावट वेबसाइट किंवा एपीके (APK) फाइल या बनावट अॅपच्या लिंकसह मेसेजच्या माध्यमातून पाठवत आहेत. अशा बनावट अॅपमुळे आपल्या मोबाइलमधली बँक डिटेल्स, यूपीआय (UPI), क्रेडिट-डेबिट कार्ड माहिती, नेट बँकिंग अशी संवेदनशील माहिती चोरली जात आहे. याप्रकरणी आयआरसीटीसीनं (IRCTC) आपल्या यूझर्सना याबाबत सावध केलंय. इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून, लिंकवरून असली संशयास्पद अॅप डाउनलोड करू नयेत. कोणत्याही संशयास्पद वेबसाइटला भेट देऊ नये, असं आयआरसीटीसीनं म्हटलंय.
स्कॅमर घेतात गैरफायदा
आयआरसीटीसीनं आपल्या यूझर्सना सावध केलंय. रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी आयआरसीटीसीनं अॅप सुविधा उपलब्ध केलीय. अनेकवेळा प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नाही. याचाच गैरफायदा स्कॅमर्स घेत असतात. लिंक पाठवली जाते. या अॅपद्वारे किंवा वेबसाइटवरून तिकीट काढल्यास ते कन्फर्म होतं, असं आमिष संबंधित मेसेजमध्ये दाखवलं जातं. आधीच तिकीट न मिळाल्यानं प्रवासी तणावात असतो. अशात संबंधित लिंक क्लिक केल्यास स्कॅमरचा आपल्या मोबाइल किंवा लॅपटॉपमध्ये प्रवेश होते आणि सुरू होते फसवणूक.
IRCTC’s Dangerous Dupe! Fake app that Android users should beware ofhttps://t.co/v1nxRiP7yA
— Financial Express (@FinancialXpress) April 19, 2023
लिंक पाठवून फसवणूक
‘irctcconnect.apk’ अशाप्रकारच्या अॅप किंवा https://irctc.creditmobile.site अशा फिशिंग वेबसाइटवरून प्रवाशांना लुबाडलं जातंय. यामुळे प्रवाशांना तर मनस्ताप होतोच मात्र रेल्वेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अँड्रॉइड मोबाइलवरून सर्रास अशा लिंक पाठवल्या जात आहेत. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म जसं की व्हाट्सअॅप, टेलिग्राम यावरून या लिंक पाठवल्या जातात. संबंधित अॅप डाउनलोड करण्यात सांगितलं जातं. फसवणूक करणारे फिशिंग लिंक पाठवतात आणि अँड्रॉइड यूझर्स त्यावर क्लिक करून त्या डाउनलोडही करत आहेत. यामुळे आपल्या मोबाइलमधला संवेदनशील डेटा या फसवणूक करणाऱ्यांच्या हाती जातो.
काय म्हटलं आयआरसीटीसीनं?
कोणत्याही संशयास्पद लिंक क्लिक करू नका. अँड्रॉइडसाठीच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरूनच अॅप डाउनलोड करावं, असं आयआरसीटीसीनं म्हटलंय. अँड्रॉइड यूझर्सनं गुगल प्ले स्टोअर तर अॅपलच्या यूझर्सनी अॅपल स्टोअरवरूनच आयआरसीटीसीचं अधिकृत आयआरसीटीसी रेल कनेक्ट (IRCTC Rail Connect) हे अॅप डाउनलोड करावं. आयआरसीटीसी आपल्या यूझर्स किंवा ग्राहकांना कधीही त्यांचा पिन, ओटीपी, पासवर्ड, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड डिटेल्स, नेट बँकिंग पासवर्ड किंवा यूपीआयची माहिती विचारत नाही तसंच कॉलदेखील करत नाही. त्यामुळे सावधान राहण्याचा इशारा आयआरसीटीसीनं दिलाय.