Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लग्न समारंभासाठी 'ही' आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल्स, भाडे किती? वाचा

Jio World Garden

Image Source : https://www.freepik.com/

तुळशी विवाहानंतर लगीनसराईला सुरुवात होते. लग्न अविस्मरणीय व्हावे अशी अनेकांची इच्छा असतात. त्यामुळे लग्नाचे ठिकाणं देखील खास असणे गरजेचे असते. महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत, जेथे अगदी राजेशाही थाटात लग्न पार पडते.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे हा दिवस खास बनविण्यासाठी जय्यत तयारी केली जाते. अनेकजणांची धुमधडाक्यात लग्न करण्याची हौस असते. धुमधडाक्यात लग्न करण्यासाठी जागा देखील तशीच आलिशन असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत, जेथे तुम्ही अगदी राजेशाही थाटात व मोठ्या धुमधडाक्यात लग्न करू शकता. मुंबईसह पुणे, नागपूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये लग्नासाठी खास हॉल्स, हॉटेल्स आहेत. या ठिकाणी अनेक सेलिब्रेटी देखील लग्न करतात. लग्नासाठी सर्वाधिक पसंती दिल्या जाणाऱ्या अशाच काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल जाणून घेऊया. 

महाराष्ट्रातील ही ठिकाणं आहेत लग्नासाठी प्रसिद्ध

सध्या मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डन लग्न समारंभापासून ते म्यूझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण बनले आहे. या ठिकाणी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही अगदी थाटामाटात लग्न करू शकता. येथे एकाचवेळी 9 हजार लोक एकत्र येऊ शकतात. एवढेच नाही तर तब्बल 2 हजार गाड्या पार्क करण्याची देखील येथे सुविधा आहे.  येथील  एक दिवसाचे भाडे हे जवळपास 15 लाख रुपये एवढे आहे. 

जिओ वर्ल्ड गार्डनप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर भागामधील काही हॉटेल्स व रिसॉर्ट्स देखील लग्नासाठी प्रसिद्ध आहेत.

  1. हिल्टॉन गार्डन इन - पुणे
  2. रॅडिसन ब्लू - अलिबाग
  3. मुधबन विलेज – नागपूर
  4. Conrad – पुणे
  5. आयटीसी ग्रँड सेंट्रल – मुंबई
  6. Della Resorts – पुणे

ही ठिकाणं देखील लग्नासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.

या ठिकाणी लग्न करण्यासाठी जवळपास 10 ते 20 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च पाहुणे व रुम्सच्या संख्येवरून कमी-जास्त होऊ शकतो. 

लग्न समारंभासाठी मिळतील सर्व सोयी-सुविधा

कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत आलिशान व अविस्मरणीय लग्न करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणं तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. या ठिकाणी लग्नासाठी 300 ते 500 पाहुणे सहज उपलब्ध राहू शकतात. हॉटेल्समध्ये पाहुण्यासाठी राहण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे. तसेच, लग्नासाठी खास हॉल, डीजे, पार्किंगची देखील सुविधा उपलब्ध आहे.

मात्र, या ठिकाणी लग्न करण्यासाठी सर्वाधिक खर्च हा जेवणाचा असतो. या हॉटेल्समध्ये जेवणासाठीचा प्रति प्लेट खर्च हा जवळपास 2 ते 4 हजार रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही जर थाटामाटात लग्न करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणं योग्य आहेत.

सेलिब्रेटी करतात या ठिकाणी लग्न

भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, जेथे लग्न आयोजित करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च येतो. अनेक सेलिब्रेटी, कोट्याधीश या ठिकाणी लग्न समारंभ आयोजित करण्याला प्राधान्य देतात. राजस्थानच्या उदयपूर येथील ताज लेक पॅलेस हे असेच लग्न समारंभाचे आयोजन करण्यासाठीचे प्रसिद्ध ठिकाणं आहे. या ठिकाणी लग्न करण्यासाठी जवळपास 80 लाख ते 1.50 कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो.

याशिवाय, राजस्थानमधील निमराना फोर्ट पॅलेस, उमेद भवन पॅलेस, रामबाग पॅलेस, जयपूरमधील ताज हॉटेल, हैदराबादमधील फलकनुमा पॅलेस, दिल्लीतील रित्झ अँबिएंस गोल्फ ड्राइव्ह ही देखील लग्नाचे आयोजन करण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणं असून, याचे भाडे देखील लाखो रुपये आहे.