Best bike Loan offers: प्रत्येकाच्या मनात कुठल्या ना कुठल्या कंपनीची आवडती दुचाकी बाइक घर करून बसलेली असते. मग मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी किंवा डोंगराळ भागात सोलो ट्रिपसाठी जाताना स्टाइलिश आणि दमदार बाइक घेण्याची जर इच्छा असेल तर वाट पाहू नका. दुचाकी वाहनांच्या वाढत्या किंमती पाहात तुम्हाला बाइक लोनही मिळू शकते.
स्पोर्टी आणि जास्त इंजिन क्षमतेची दुचाकी खरेदी करण्यासाठी तुम्हाला 2,3 लाखांपेक्षाही जास्त पैसे लागू शकतात. एवढे पैसे जवळ नसतील तर किरकोळ रक्कम भरून आघाडीच्या बँकेतून लोन मिळवू शकता. पाहूया कोणत्या बँका बाइक लोनवर चांगल्या ऑफर्स देत आहेत.
इलेक्ट्रिक दुचाकीसाठी लोन मिळेल का?
होय, इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीसाठी तुम्ही बँक आणि बिगर बँक वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळवू शकता. दुचाकीवरील कर्जफेडीचा कालावधी सहसा कारलोन पेक्षा कमी असतो. हा कालावधी 5 वर्षापर्यंतचा असू शकतो. दुचाकीवर लोन घेताना प्रोसेसिंग शुल्क आणि इतरही प्रकारचे शुल्क लागू होतात. त्यासाठी तुम्हाला संबंधित बँकेशी संपर्क करावा लागेल.
दुचाकी लोनला अप्लाय करण्यासाठी कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या.
कोणतेही कर्ज देताना बँक सर्वप्रथम ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर चेक करते. त्यामुळे आधी क्रेडिट स्कोअर चेक करा. जर स्कोअर कमी असेल तर आधीचे कर्ज असेल तर कर्ज फेडल्यानंतर अप्लाय करा.
दुचाकी लोनवर सहसा 95% पर्यंत कर्ज मिळले. वरील 5% रक्कम तुम्हाला भरावी लागेल. प्रत्येक बँकेनुसार हे प्रमाण बदलू शकते.
आघाडीच्या बँकांच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला बाइक लोनवर किती इएमआय भरावा लागू शकतो, हे चेक करता येईल. EMI कॅल्युलेटर चा वापर करा.
फिक्स्ड किंवा व्हेरिएबल अशा दोन्ही प्रकारचा व्याजदर तुम्हाला मिळू शकतो. सहसा फिक्स्ड म्हणजेच निश्चित व्याजदर जास्त असतो. तर RBI ने रेपो रेटमध्ये बदल केल्यास व्हेरिएबल लोनच्या व्याजदरात बदल होतात.
तुमचे उत्पन्न पाहून बँक कर्ज मंजूर करत असते. त्यामुळे उत्पन्नानुसारच कर्जासाठी अर्ज करा. अन्यथा कर्ज नामंजूर होऊ शकते.
विविध बँकांचे व्याजदर चेक केल्यावर कर्जासाठी अर्ज करा. तसेच लोन अॅग्रिगेटर साइटवरुनही बँका आणि बिगर बँक वित्त संस्थांचे व्याजदर समजू शकतात.
टीप - बँकांचे दर बँकबझार.कॉम या संकेतस्थळावरून घेतले आहे. बँकेच्या व्याजदरात बदल होऊ शकतो. अद्यायावत व्याजदर आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी बँकेशी संपर्क करा.