Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Buying Home On Wife Name : पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी घेतल्यास मिळेल अनेक गोष्टींचा लाभ

Buying Home On Wife Name

Buying A Home On Wife Name : आर्थिक व्यवहारांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी सरकारने मालमत्ता कर आणि सुविधांमध्ये सूट दिली आहे. महिलांना त्यांचा मालकी हक्क दिल्याने आर्थिक आणि कौटूंबिक संतुलनही वाढते. साक्षरता आणि आर्थिक समानता यामुळे गेल्या काही वर्षांपासुन मालमत्ता खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.

Benefits Of Buying A Home On Wife Name : महिलांना साक्षर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे. त्यामुळेच महिलांना आता मालमत्ता करात सूट देण्यात आली आहे. तसेच महिलांना इतरही आर्थिक लाभ मिळावे, यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या जात आहे. तरीदेखील अद्यापही महिला या सगळ्या गोष्टींपासुन वंचित आहेत.

महिलेची आर्थिक सुरक्षा आणि स्वातंत्र्य

जर एखाद्या महिलेकडे मालमत्तेची मालकी असेल, तर तिची आर्थिक बाजू मजबूत राहाते आणि ती स्वावलंबी बनते. महिलेचा संपत्तीवर अधिकार असल्यास ती पूर्ण स्वातंत्र्याने कोणताही निर्णय घेऊ शकते. अकस्मात तिच्या सोबत कोणतीही दूर्घटना घडल्यास तिला निराधार व्हावे लागत नाही. त्यामुळे आजच्या काळात मालमत्ता महिलांच्या नावावर असणे, काळाची गरज आहे.

कमी व्याजदरावर गृह कर्ज (Low Interest Rates HL)

तुम्हाला जर का घर घ्यायचे असेल तर, तुम्ही ते पत्नीच्या नावावर घेऊ शकता. कारण गृहनिर्माण वित्त संस्था पुरुषांच्या तुलनेत महिलांना व्याजदरात सवलत देते. तसेच अनेक बँका महिलांना डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे उत्पन्न आणि क्षमतेनुसार विविध प्लॅन देतात.

मालमत्ता दरात सुट (Exemption From Property Rates)

महिलांना मालमत्ता संबंधित करातही सूट मिळते. महापालिकेने आपल्या योजनांमध्ये आधीच तशी तरतूद करुन ठेवली आहे. परंतु ती मालमत्ता जर महिलेच्या नावावर असेल, तरच तुम्हाला कर लाभ मिळू शकतो.

मुद्रांक शुल्कात सूट (Exemption In Stamp Duty)

अनेक राज्यांमध्ये महिलांच्या नावावर मालमत्तेची नोंदणी म्हणजेच रजिस्ट्री करायची असल्यास त्यांना मुद्रांक शुल्कात सूट दिली जाते. हा दर पुरुषांसाठी आकारल्या जाणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या दरापेक्षा दोन - तीन टक्के कमी असतो.

महाराष्ट्र राज्य सरकारने ९ मार्च २०२३ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला मालमत्ता खरेदीदारांसाठी मुद्रांक शुल्कावरील १% सवलत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे, महिलांसाठी मालमत्तेवरील मुद्रांक शुल्क मालमत्तेच्या मूल्याच्या ५% आहे, तर पुरुषांसाठी मालमत्तेवरील मुद्रांक शुल्क मालमत्ता मूल्याच्या ६% आहे.