Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. 31 मे 2019 पासून प्रधानमंत्री किसान मानधन योजना राबविण्यात येत आहे. प्रधान मंत्री किसान मानधन योजना देशातील सर्व शेतकर्यांना त्यांच्या वृद्धापकाळात योग्य प्रकारे जगता यावे, या उद्देशाने सुरू करण्यात आली. ज्या अंतर्गत लाभार्थ्याला 60 वर्षे वय झाल्यानंतर दरमहा 3,000 रुपये किमान खात्रीशीर पेन्शन मिळेल. लाभार्थीचा मृत्यू झाल्यास, लाभार्थीच्या जोडीदाराला निवृत्ती वेतनाच्या 50 टक्के रक्कम म्हणजेच 1500 रुपये कौटुंबिक निवृत्ती वेतन म्हणून मिळेल. कौटुंबिक पेन्शन फक्त पती किंवा पत्नीसाठी लागू असेल.
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची पात्रता
पीएम किसान मानधन वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असेल. अर्जदार शेतकऱ्याचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, अल्पभूधारक शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र असतील. अशा शेतकऱ्यांचे नाव 1 ऑगस्ट 2019 पर्यंत राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या जमिनीच्या नोंदींमध्ये असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड आणि बचत बँक खाते किंवा IFSC सह जन धन खाते असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत, जर एखाद्या शेतकऱ्याने वयाच्या 18 व्या वर्षी ही योजना सुरू केली, तर त्याला मासिक 55 आणि वार्षिक 660 प्रीमियम रक्कम भरावी लागेल. आणि जर एखाद्या शेतकऱ्याला वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्याला मासिक 200 प्रीमियम आणि वार्षिक 2400 प्रीमियम रक्कम भरावी लागेल. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अर्जदार पेन्शनच्या रकमेसाठी दावा करू शकतो.
योजनेंतर्गत होणारा फायदा
पीएम किसान योजनेंतर्गत सरकार दर वर्षी 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये गरीब शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. दोन्ही योजनेचा लाभ सोबत घेत असल्यास पेन्शन योजनेत भरावयाचा प्रीमियमही 3 हप्त्यांमध्ये मिळालेल्या रकमेतून कापला जाईल. त्याचबरोबर या योजनेंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शनचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. यासोबतच 2000 चे 3 हप्तेही येत राहतील. तर वयाच्या 60 नंतर ते वार्षिक 42000 रुपये मिळेल.