Important Things Of Sukanya Samrudhi Yojana : सरकारकडून मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना राबवली जात आहे. ‘बेटी बचाओ और पढाओ’ मोहिमेचा एक भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये, हा सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर सरकार दरवर्षी ८ टक्के दराने व्याज देते.
Table of contents [Show]
8 टक्के व्याजदर दिले जाते
मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नाची चिंता दूर करण्यासाठी सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव 'सुकन्या समृद्धी योजना' आहे. ही सरकारी योजना आहे. ही योजना केंद्र सरकारने बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेअंतर्गत सुरू केलेली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना भविष्यात संकटाचा सामना करावा लागू नये, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यावर सरकार जमा केलेल्या रकमेवर वार्षिक आधारावर 8 टक्के व्याजदर देते.
आयकर सूट मिळते
या योजनेअंतर्गत 10 वर्षाच्या मुलीचे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते. सुकन्या समृद्धी योजने मध्ये वार्षिक आधारावर तुम्ही 250 ते 1.5 लाख रुपया पर्यंत रक्कम जमा करू शकता. या योजनेअंतर्गत जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला आयकराच्या कलम 80C अंतर्गत सूटही मिळते. परंतु, या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
लॉक-इन कालावधी
या योजनेचा लॉक-इन कालावधी 21 वर्षांचा आहे, म्हणजेच ही योजना 21 वर्षांत परिपक्व होईल. अशा परिस्थितीत तुम्ही मुदतपूर्व पैसे काढू शकत नाही. तुम्ही जर का मुदतपूर्वी पैसे काढले तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. या योजनेमधून मुलगी 18 वर्षांची झाल्यावर शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम काढता येते. त्याचवेळी खातेदाराचा अचानक मृत्यू झाल्यास, नॉमिनी मुदतीपूर्वी पैसे काढू शकतात. अन्यथा मुलगी 21 वर्षांची झाल्यावरच सर्व पैसे काढता येतील. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला संपूर्ण 21 वर्ष पैसे जमा करावे लागणार नाहीत. खाते उघडल्यापासून 15 वर्षांसाठीच पैसे जमा करता येतात.
अत्यंत कमी परतावा
इतर बचत खात्यांच्या तुलनेत 'सुकन्या समृद्धी योजना'ही भरपूर व्याज देते. मात्र म्युच्युअल फंड, स्टॉक आणि बाँड यांसारख्या इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत परतावा अजूनही खूप कमी आहे.
ही योजना फक्त मुलींसाठी आहे
'सुकन्या समृद्धी योजना' फक्त मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच कुटुंबातील मुलींव्यतिरिक्त तुमच्या मुलाच्या किंवा कुटूंबातील इतर सदस्यांच्या नावावर गुंतवणूक करु शकत नाही. ज्यांच्या करू मुली नाही, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
कर सूट
या योजनेत मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढल्यास गुंतवणूकदाराला दंड भरावा लागेल. या योजनेत कर सवलत उपलब्ध आहे. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवलेली रक्कम, व्याजाचे उत्पन्न आणि मुदतपूर्तीची रक्कम सर्व करमुक्त आहे. इतकेच नाही तर, आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत, गुंतवणूकदार गुंतवलेल्या मूळ रकमेवर दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतचे कर लाभ घेऊ शकतात.