Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Summer Vacation Destinations : उन्हाळ्याच्या सुटीत ‘या’ सहलीच्या ठिकाणांचा नक्की विचार करा

Summer Vacation Destinations

Summer Vacation Destinations : उन्हाळ्याची सुटी सुरू झाली की, मुलांची पालकांकडे ट्रिपसाठी हाकाटी सुरू होते. आई-वडिलांना बघायचं असतं ते बजेट. या उन्हाळ्यात राज्य किंवा देशाबाहेर मुलांना नेता येणार नसेल तर महाराष्ट्रातल्याच या ठिकाणांचा विचार नक्की करा

Summer Vacation Destinations: उन्हाळ्याची सुटी सुरू झाली की, मुलांची पालकांकडे ट्रिपसाठी हाकाटी सुरू होते. आई-वडिलांना बघायचं असतं ते बजेट. या उन्हाळ्यात राज्य किंवा देशाबाहेर मुलांना नेता येणार नसेल तर महाराष्ट्रातल्याच या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. तुमच्या बजेटमधील ठिकाणे पुढीलप्रमाणे….. 

महाबळेश्वर (Mahabaleshwar)

सह्याद्री पर्वतात वसलेले, महाबळेश्वर हे  उन्हाळ्यात फिरायचा प्लॅन करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. एकदा मुंबईची ग्रीष्मकालीन राजधानी, महाबलेश्वरमध्ये शांत आणि मोहक ठिकाणे भेट देण्यासाठी जादूपेक्षा कमी काही नाही. इथे तुम्ही मार्च ते जून महिन्यात भेट देऊ शकता. या काळात सर्वाधिक मज्जा मस्ती या ठिकाणी होऊ शकते.

mahabaleshwar.jpg
http://www.mahabaleshwartourism.in/

येथील मुख्य आकर्षण म्हणून महाबलेश्वर मंदिर, मोरारजी कासल, वेण्णा तलाव, प्रतापगड, मॅप्रो गार्डन, तोपोला, लिंगमाला फॉल्स, लॉडविक पॉईंट, एलिफंट हेड पॉइंट आणि बरेच काही प्रसिद्ध आहे. तेथील विल्सन पॉईंट, महाबलेश्वर टेकडीवरील माउंटन बाइकिंग, तोपोला ते बामनोली बेटावरील नौका, रॉक क्लाइंबिंग, घुसखोरी, ट्रेकिंग इत्यादि बाबी तुम्हाला नक्की आवडतील.  5000 ते 7000 रुपयांमध्ये तुमचा 2 दिवसीय टुर होतो.

शेगाव (Shegaon)

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील हे गाव आहे. येथे श्री गजानन महाराजांची समाधी आणि भव्य मंदिर आहे. भाविकांसाठी तर सर्वोत्तम ठिकाण आहेच पण मुलांना एंजॉय करण्यासाठी सुद्धा हे ठिकाण सर्वात बेस्ट आहे. आनंद सागर मध्ये मुलांसाठी वेगळवेगळे खेळणी त्याचबरोबर ट्रेन, झोपाळा आणि बरेच काही आहे. 

shegaon.jpg
http://www.istock.com/

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथून शेगाव साठी ट्रेन नेहमी सुरू असते. तेथून ट्रेन तिकीट 100 रुपये आहे. तुम्ही इतर ठिकाणहून येत असाल तर तुमचा शेगाव टुर हा 4000 ते 5000 हजार रुपयांमध्ये होतो.

चिखलदरा (Chikhaldara)

अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा. हे ठिकाण शहरापासून दूर आणि अतिशय शांत आहे. येथील हवामान देखील इतके आल्हाददायक आहे की येथे दररोज हजारो पर्यटक भेट देण्यासाठी येतात. महाराष्ट्रातील हे ठिकाण सुंदर तलाव, धार्मिक स्थळे आणि प्राचीन इतिहासासाठी ओळखले जाते. 

हे ठिकाण महाभारत काळातील अनेक रहस्यांसाठी देखील ओळखले जाते. पंचबोल पॉइंट, गुगामल नेशनल पार्क, भीम कुंड हे तेथील प्रमुख आकर्षण आहे. चिखलदरा टुर तुम्ही 3000 त्  5500 रुपयांमध्ये करू शकता.

बाजारगाव फन अँड फूड (Bazargaon Fun and Food)

हे ठिकाण नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयोगी आणि आनंद देणारी जागा म्हणजे फन अँड फूड. येथे स्विमिंग पूल, लहान मुलांसाठी खेळण्याच्या वस्तु, डान्स सर्वच गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाते. 

bazar-gaon-fun-and-food.jpg
http://www.funnfood.com/

तेथील तिकीट लहान मुलांसाठी 800 आणि बाकी 1300 रुपये आहे. येथील एंजॉय सुद्धा तुम्ही 3000 ते 5000 रुपयांपर्यंत करू शकता.

माथेरान (Matheran)

भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन असूनही, माथेरानला उन्हाळ्यात भेट देण्याची वेळ ही अत्यंत सोयीची असते. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात स्थित माथेरान साहसी जीवनास त्याच्या हिरव्या आणि वन्य मार्गाने वन्यजीवन समृद्ध असलेले आणि ट्रेकिंग व हायकिंगसाठी प्रसिद्ध आहे. या स्थळाला नोव्हेंबर ते जून महिन्यात भेट दिल्यास वेगळा आनंद मिळू शकतो. 

तेथील मुख्य आकर्षण पॅनोरामा पॉइंट, इको पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट, शार्लोट लेक, अलेक्झांडर पॉइंट, प्रबळ किल्ला हे आहेत. 4000 ते 6000 रुपयांमध्ये तुम्ही तुम्हाला हवा तसा माथेरान टुर करू शकता.