Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank : बँकांनी चालू आर्थिक वर्षात रोख्यांच्या माध्यमातून विक्रमी 91,500 कोटी रुपये उभारले

Bank

एजन्सी इक्रा (ICRA) ने सांगितले की, बँकांनी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आतापर्यंत 91,500 कोटी रुपयांचे रोखे जारी केले आहेत. हा स्वतःच एक विक्रम आहे.

बँकांनी चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 91,500 कोटी रुपयांचे विक्रमी रोखे जारी केले आहेत आणि आर्थिक वर्षाच्या अखेरीस ते 1.4 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. रेटिंग एजन्सी  इक्रा (ICRA) ने सांगितले की, बँकांनी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आतापर्यंत 91,500 कोटी रुपयांचे रोखे जारी केले आहेत. हा स्वतःच एक विक्रम आहे. यापूर्वीचा विक्रम 80,000 कोटी रुपयांचा रोखे जारी करण्याचा होता जो 2016-17 या आर्थिक वर्षात करण्यात आला होता.

क्रेडिट-ठेवी अंतर भरून काढण्यासाठी विविध पद्धतींचा वापर

मार्च 2023 अखेर हा आकडा 1.3-1.4 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, असे ICRA रेटिंगने म्हटले आहे. भांडवल उभारणीचे पर्यायी साधन म्हणून बँका रोखे जारी करतात. रेटिंग एजन्सीने सांगितले की, कर्ज आणि ठेवी यांच्यातील तफावत वाढल्याने बँकांनी भांडवल उभारणीसाठी या आर्थिक वर्षात विक्रमी प्रमाणात रोखे जारी केले आहेत. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत ठेवींपेक्षा कर्जाची मागणी जास्त राहण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, 16 डिसेंबरपर्यंत कर्जे 12.7 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली असून एकूण ठेवी 8.9 लाख कोटी रुपये होत्या. इक्रा (ICRA) ने सांगितले की ही क्रेडिट-ठेवी अंतर भरून काढण्यासाठी, बँकांनी रोखे जारी करण्यासह विविध वित्तपुरवठा पद्धतींचा अवलंब केला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त रोखे जारी 

आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत बँकांनी जारी केलेल्या एकूण रोख्यांची रक्कम 90,000 कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा 70,000 कोटी रुपयांच्या आसपास होता. ICRA चे उपाध्यक्ष आणि वित्तीय क्षेत्र रेटिंगचे प्रमुख आशय चोक्सी यांनी आर्थिक वर्षाच्या अखेरीस सिस्टम-व्यापी क्रेडिट-ठेवी गुणोत्तर 76.3-76.5 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा केली आहे. हे प्रमाण 16 डिसेंबर 2022 रोजी 74.8 टक्के होते.