सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank Of Maharashtra) या आर्थिक वर्षाच्या (FY 2023-24) च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानुसार जून अखेरपर्यंतच्या तिमाहीमध्ये बँकेच्या नफ्यात चांगली वाढ दिसून आली आहे. या तिमाहीत बँकेच्या नफ्यामध्ये 95 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतर बँकेचा निव्वळ नफा 882 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेचा नफा 451 कोटी रुपये इतका होता.
NPA मध्ये सुधारणा
बँकेच्या निव्वळ नफ्यामध्ये वाढ होण्याबरोबरच या तिमाहीमध्ये बँकेची एकूण नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPA)2.28 टक्के राहिली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीमध्ये ही बँकेच्या NPA ची संख्या ही 3.74 टक्के होती. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत एकूण नॉन परफॉर्मिंग अॅसेट(GNPA)4006 कोटी रुपये आह. बँकेचा निव्वळ एनपीए या तिमाहीत वार्षिक 0.88 टक्क्यांवरून 0.24 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर या तिमाहीत कर्जदारांचा NPA 413 कोटी आहे.
ठेवीमध्ये 15 टक्के वाढीचा अंदाज
बँकेला चालू आर्थिक वर्षात 20-22 टक्के पत वाढीची अपेक्षा आहे. तर ठेवींमध्ये 14-15 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.पत वाढ पूर्ण करण्यासाठी, बँक टियर I आणि टियर II बाँडमधून 2,000 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे (BoM) व्यवस्थापकीय संचालक ए एस राजीव म्हणाले,
बँकेचा शेअर्स वधारले
पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर होताच शेअर मार्केटमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. बँकेच्या शेअर्समध्ये आज 5.40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.