दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत बदलून घेण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.मात्र बँक खात्यात पैसे जमा करताना ग्राहकांना शुल्क भरावे लागते. 2000 च्या नोटांबाबत मात्र बँकांनी निर्णय घ्यायचा आहे. यात कॅनरा बँक आणि आयसीआयसीआय बँक या दोन बँकांनी शुल्काबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही बँकांनी 2000 रुपयांच्या नोटा डिपॉझिट करताना कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवार 23 मे 2023 पासून बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.येत्या 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सर्व बँकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याचे काम करावे लागणार आहे.रिझर्व्ह बँकेने तशा प्रकारच्या सूचना बँकांना दिल्या आहेत.
नागरिकांना दोन हजारांच्या नोटा बदलून घेता येणार आहेत. त्याशिवाय या नोटा चलनात 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वैध आहेत.एका व्यक्तीला एकावेळी 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलून घेता येतील.अर्थात एकावेळी 20000 रुपयांचे चलन बदलून मिळणार आहे.
आयसीआयसीआय बँकेने सर्वच शाखांमध्ये आणि कॅश डिपॉझिटमध्ये मशीनमध्ये 2000 रुपयांच्या नोटा डिपॉझिट करु शकतात, असे म्हटले आहे. 2000 रुपयांच्या नोटा बँक खात्यात जमा करण्यास कोणतीही कमाल मर्यादा नाही, असे आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिकांना डोअर स्टेप बॅंकिगचा पर्याय आहे. वैयक्तिक बचतखातेदारांना 2000 रुपयांच्या नोटा बँक खात्यात जमा केल्यास त्यावर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कोणतेही शुल्क आकारणार नाही, असे आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे.
नोटा बदलून घेण्याबाबत प्रत्येक शाखेत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, असे आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे. काही निवडक शाखांमधील कॅश डिपॉझिट मशीनमध्ये ग्राहकांना 24 तास आठवड्याचे 7 दिवस 2000 रुपयांच्या नोटा डिपॉझिट करता येतील, असे बँकेने म्हटले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने देखील 2000 रुपयांच्या नोटा सेव्हिंग आणि करंट अकाउंटमध्ये जमा केल्यास त्यावरील शुल्क माफ केले आहे. कॅनरा बँकेने याबाबत ट्विट केले आहे. कॅनरा बँकेने कॅश रेमिटन्स चार्जेस माफ करण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे.