Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Rupee: परकीय गंगाजळी वाचवण्यासाठी बांगलादेश भारतासोबतचा व्यापार रुपयात करणार

Indian Rupee

Image Source : www.zeenews.india.com

जागतिक स्तरावर व्यापारात अनेक देश डॉलरऐवजी स्थानिक आणि प्रादेशिक चलनाला महत्त्व देत आहेत. बांगलादेश भारतासोबतचा व्यापार रुपया चलनामध्ये करणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ICICI या बँकांमध्ये बांगलादेशने खाती सुरू केली आहेत. येत्या काळात दोन्ही देशातील व्यापार बांगलादेशी चलन टाका आणि भारतीय रुपयात होईल.

India-Bangladesh Trade: बांगलादेशी बँक परकीय गंगाजळी वाचवण्यासाठी डॉलरऐवजी भारतीय रुपयामध्ये व्यापार करण्याचे नियोजन करत आहे. परकीय चलनाचा साठा वाचवण्यासाठी तसेच डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी बांगलादेशी बँका भारतीय रुपयाला महत्त्व देत आहेत. इस्टर्न बँक आणि सोनाली बँक या दोन बँका भारतासोबत रुपयांमध्ये व्यवहार करणार आहेत. रुपया आणि बांगलादेशी चलन टाका मधील विनिमय दर स्थिर असल्याचे हा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.

इस्टर्न बँकेने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेत रुपी खाते सुरू केले आहे. (India-Bangladesh Trade in rupees) 11 जुलैला रुपयात व्यवहार करण्याची घोषणा इस्टर्न बँक करणार आहे. तर बांगलादेशातील सार्वजनिक क्षेत्रातील सोनाली बँकही लवकरच रुपयात व्यवहार सुरू करण्याची घोषणा करणार आहे. त्यानंतर इतरही बांगलादेशी बँका रुपयातील व्यवहार सुरू करतील.

रुपया चलनातील व्यापार दोन्ही देशांसाठी फायदेशीर 

व्यापारासाठी डॉलरवर कमीतकमी अवलंबून राहण्याचा कल जगभरातील देशांमध्ये दिसून येत आहे. स्थानिक आणि प्रादेशिक चलनाच्या वापरामुळे आणीबाणीच्या काळात परकीय चलन साठवून ठेवता येईल. भारत-बांगलादेश व्यापारात रुपयाच्या वापर सुलभ आणि फायदेशीर ठरत आहे, असे इस्टर्न बँकेचे संचालक अली रझा यांनी नुकतेच म्हटले आहे. विनिमय खर्च आणि व्यापार दोन्ही देशांना अल्प किंमतीमध्ये करता येईल, असेही त्यांनी म्हटले.

मागील आर्थिक वर्षात भारताने बांगलादेशला तेराशे कोटी रुपयांचे वस्तू आणि सेवा निर्यात केल्या. (India-Bangladesh Trade in rupees) यापैकी दोनशे कोटी डॉलरचे व्यवहार रुपया चलनात होणार आहेत, असे बांगलादेशातील आघाडीच्या द बिझनेस स्टँडर्ड या वृत्तपत्राने म्हटले आहे. दरम्यान, बांगलादेशने भारताला दोनशे कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा निर्यात केल्या होत्या. हे व्यवहारही रुपयामध्ये पूर्ण केले जातील, अशी माहिती समोर येत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधी मंडळाने एप्रिल महिन्यात बांगलादेशचा दौरा केला होता. दोन्ही देशांतील व्यापार बांगलादेशी चलन टाका आणि भारतीय चलन रुपयामध्ये कसा करता येईल, यावर चर्चा झाली होती.

बांगलादेश रुपी डेबिट कार्ड आणणार

सप्टेंबर महिन्यात बांगलादेशी सेंट्रल बँक रुपी डेबिट कार्ड लाँच करणार आहे. त्यानुसार बांगलादेशी नागरिक भारतामध्ये दरवर्षी 12 हजार डॉलरच्या एवढ्या तुलनेत रुपये खर्च करू शकणार आहे. भारतात पर्यटन किंवा इतर कारणासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या सेवेचा फायदा घेता येईल.