भारतात इंधन म्हणून इथेनॉलच्या (Ethanol)वापरात वाढ होत आहे.सध्य स्थितीत भारतात E20 हे इथेनॉल मिश्रीत इंधन (ethanol blended petrol) वापरण्यात येत आहे. भविष्यात याच्यामध्ये आणखी वाढ करण्याचे सरकारचे धोरण आहे. त्याच बरोबर भारतात सध्या इथेनॉलच्या उत्पादन वाढीवर देखील भर दिला जात आहे. दरम्यान, आता भारताचे शेजारी राष्ट्र बांगलादेश आणि श्रीलंका या देशांनी भारताकडून इथेनॉल निर्यात करण्यासंदर्भात विचारणा केली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे.
फ्लेक्स इंधनाचा वापर-
भारतात इथेनॉलच्या उत्पादनात वाढ होत आहे. यासासाठी साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच देशात तब्बल 1800 पेट्रोल पंपावर इथेनॉल मिश्रीत पेट्रोल (ethanol blended petrol) उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याच बरोबर भविष्याच्या दृष्टीने भारतातील वाहन कंपन्यांना फ्लेक्स इंजिनची वाहने तयार करण्यासंदर्भात देखील सुचित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात पहिली 100% इथेनॉलवर चालणारी कार नुकतीच लॉन्च करण्यात आली. या कारच्या लॉच्न प्रसंगी गडकरी यांनी भारताकडून इथेनॉलच्या निर्यातीसाठी इतर देशाकडून विचारणा होत असल्याची माहिती दिली. भारतात सध्या इथेनॉलचा दर 65 रुपये प्रतिलिटर आहे.
बांगला देश श्रीलंकेकडून विचारणा
गडकरी म्हणाले की, भारत बांगला देशाला पाईपलाईनच्या माध्यमातून इंधन पुरवठा करतो.त्याच पार्श्वभूमीवर त्या देशाच्या पंतप्रधांनानी इथेनॉलच्या बाबतीत विचारणा केली. यावेळी श्रीलंकेच्या मंत्र्यांनी देखील भारताकडून इथेनॉल निर्याती संदर्भात विचारणा केली. या दोन्ही देशांनी भारताकडून इथेनॉल खरेदीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, नुमालीगढच्या रिफायनरीमध्ये बांबू पासून इथेनॉल तयार केले जात आहे. त्यामुळे दरम्यान गडकरी यांनी भारतीय ऑईल कंपन्यांना बांगलादेशला इथेनॉल मिश्रीत इंधनाची विक्री करण्याचा सल्ला दिला आहे.
शेतकऱ्यांना होणार फायदा
भारताकडून जर या देशांना इथेनॉल अथवा इथेनॉल मिश्रीत इंधनाचा पुरवठा सुरू झाल्यास येथील कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. साखर उद्योगाने इथेनॉल निर्मितीला यापूर्वीच सुरुवात केली आहे. साखर कारखानदारांना इथेनॉल निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल हा ऊस आहे. त्यामुळे भविष्यात इथेनॉलचे उत्पादन आणि निर्यात वाढल्यास महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकणार आहे.