• 09 Feb, 2023 07:22

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bajaj Chetak EV Scooter: पुण्यात तयार झालेली बजाज चेतक युरोपातल्या रस्त्यांवर धावणार

Bajaj electric Chetak

Image Source : http://www.carandbike.com

बजाजने 1972 साली चेतक स्कूटर बाजारात आणली. त्याकाळी खूप ठराविक वाहनांची मॉडेल्सच बाजारात होती. त्यापैकी एक चेतक स्कूटर होती. ही गाडी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगलीच फेमस झाली. अनेक वर्ष महिने आधीच गाडीची बुकिंग करावी लागत असे. या गाडीचा लूक आजही भारतीयांच्या मनात घर करून बसला आहे.

Bajaj Chetak EV Scooter: बजाज चेतक या स्कूटरने एंशीच्या दशकात भारतीयांच्या मनात स्थान निर्माण केलं. या स्कूटरच्या बुकींगसाठी नागरिक कित्येक वर्ष आधीच बुकींग करुन ठेवत असत. या ऑयकॉनिक स्कूटरने अनेक वर्ष मार्केट गाजवल्यानंतर हे मॉडेल कंपनीने बंद केले होते. मात्र, आता बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने 2019 साली लाँच केली होती. आता पुण्यात तयार झालेली चेतक इव्ही स्कूटर युरोपातील रस्त्यांवर दिमाखदारपणे लवकरच धावणार आहे. पुढील वर्षापासून चेतक युरोपियन मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा विचार कंपनी करत आहे.

बजाज चेतक युरोपात जाणार( Bajaj chetak will be slod in European market)

बजाज ऑटो कंपनी आणि स्वीस स्पोर्ट्स बाइक निर्मिती कंपनी केटीएम यांच्यामध्ये जॉइंट व्हेंचर आहे. बजाज केटीएम मिळून या बाइकचे उत्पादन करतात. दोन्ही कंपन्यांमध्ये 50.1:49.9 इतकी भागीदारी आहे. 'प्रवासासाठी चेतक इलेक्ट्रिक स्कूटर हा चांगला पर्याय आहे. आमच्या प्लॅननुसार गोष्टी घडल्या तर पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चेतक स्कूटरची युरोपात विक्री करण्यात येईल. युरोपमध्ये मार्च महिना मार्केटिंग आणि विक्रीसाठी योग्य असा महिना असतो. पुढील मार्चपर्यंत आम्ही निर्यातीची तयारी करत आहोत, असे केटीएम कंपनीचे सीइओ स्टेफन पायरेर यांनी पत्रकारांना सांगितले.

bajaj-chetak-new-electric-scooty.jpg

Image Source: www.carandbike.com

पहिल्यांदा चेतक कधी आली बाजारात? (When was Bajaj Chetak launched in India)

भारतामध्ये बजाज कंपनीने 1972 साली चेतक स्कूटर आणली. त्याकाळी खूप ठराविक वाहनांची मॉडेल्स बाजारात होती. त्यापैकी एक चेतक स्कूटर होते. ही गाडी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगलीच फेमस झाली. अनेक वर्ष महिने आधीच गाडीची बुकिंग करावी लागत असे. या गाडीचा लूक आजही भारतीयांच्या मनात घर करून बसला आहे. मात्र, कालांतराने इतर गाड्या बाजारात आल्याने चेतकची विक्री कमी झाली. बजाज कंपनीचे प्रमुख राजीव बजाज यांनी 2006 साली या गाडीचे उत्पादन बंद केले. मात्र, पुन्हा 2019 साली कंपनीने ही गाडी इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये बाजारात आणली. बजाज चेतकच्या भारतामध्ये 2019 पासून 24 हजार गाड्यांची विक्री झाली आहे. इलेक्ट्रिक मॉडेलची किंमत 1 लाख 40 हजार एवढी ठेवण्यात आली असून 40 शहरांमध्ये गाडी विक्रीसाठी उपलब्ध आहे.

old-bajaj-chetak-scooty.jpg

www.bikedekho.com

बजाज आणि केटीएम दोन्ही कंपन्यांमध्ये ऑक्टोबर 2007 साली पार्टनरशीप करार झाला. 2011 साली दोघांनी मिळून पहिली गाडी लाँच केली. भारतामध्ये पाच लाख केटीएम गाड्यांची विक्री झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. पुण्यातील चाकण येथील प्रकल्पातून वर्षाला सुमारे 2 लाख KTM गाड्यांची निर्मिती केली जाते. याच प्रकल्पातून चेतक गाडीची निर्मिती केली जाते.