Triumph Bike Model: अलीकडेच ट्रायम्फ कंपनीचे दोन मॉडेल स्पीड 400 आणि स्क्रॅम्बलर 400X भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहेत. लाँच झाल्यापासून या दोन्ही मॉडेल्सना बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन्ही मॉडेल्ससाठी चांगली बुकिंगही प्राप्त झाली आहे. परिणामी, ट्रायम्फच्या या मॉडेल्सची निर्मिती करणारी कंपनी बजाज ऑटोने आपल्या मोटरसायकल पार्ट्स पुरवठादाराला दुप्पट उत्पादनासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.
Table of contents [Show]
ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
Triumph's Speed 400 आणि Scrambler 400X मॉडेल्स लाँच झाल्यापासून या दोन्ही मॉडेल्सकडे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एका आठवड्यात कंपनीला 15000 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत. सध्या, कंपनी स्टेप बाय स्टेप त्याचे उत्पादन आणि वितरण टप्प्याटप्प्याने वाढविण्यात गुंतलेली असल्याची माहिती बजाज ऑटोचे वरिष्ठ अधिकारी राकेश शर्मा यांनी दिली.
लाखोंच्या वर युनिट्स
Speed 400 आणि Scrambler 400X लाँच झाल्यापासून, बजाज ऑटो कंपनीला आतापर्यंत 15,000 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत. या बुकिंगची संख्या चालू आर्थिक वर्षात कंपनी 40,000 ते 45,000 युनिट्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नात आहे. पुढील आर्थिक वर्षात कंपनी सुमारे 100000 ते 1,20,000 युनिट्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
विदेशात होणार निर्यात
Speed 400 आणि Scrambler 400X दोन्ही मिडलवेट मोटरसायकल श्रेणीत येतात. बजाज ऑटो कंपनी यूके कंपनी ट्रायम्फच्या सहकार्याने या दोन्ही मॉडेल्सची निर्मिती करत आहे. ऑक्टोबर महिन्यापासुन या दोन्ही मॉडेल्सची विदेशात निर्यात सुरू होण्याची शक्यता कंपनीच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
बजाज ऑटो कंपनीला मिळेल स्टेक
मोटारसायकल उत्पादक सध्या 250 सीसी बाईक सेगमेंटवर भर देत आहेत. कंपन्या 250 सीसी सेगमेंटमध्ये बरीच मॉडेल्स लाँच करत आहेत. परिणामी, स्पर्धा खूप वेगवान होताना दिसत आहे. याशिवाय मोटारसायकल कंपन्यांचे मूल्य आणि व्हॉल्यूम दोन्ही वाढताना दिसत आहे. या दोन्ही बाईक लाँच केल्यानंतर 250cc सेगमेंटमध्ये बजाज ऑटो कंपनीला मजबूत मार्केट शेअर मिळेल असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.