Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Baipan Bhari Deva BO Collection: मंगळागौर पावली! बॉक्स ऑफिसवर 10 दिवसांत केली 'इतक्या' कोटींची कमाई

Baipan Bhari Deva BO Collection

Baipan Bhari Deva BO Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले आहे. या दहा दिवसांत चित्रपटाने किती कोटींची कमाई केली, जाणून घेऊयात.

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले असून या चित्रपटाला अजूनही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील गाण्यांचे आणि डायलॉगचे रिल्स बनत आहेत.

खास महिलांच्या आयुष्यावर रेखाटण्यात आलेल्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), दीपा परब (Deepa Parab), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone) आणि शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन आज 10 दिवस झाले असून चित्रपटाच्या कमाईवर एकदा नजर टाकूयात.

दहा दिवसातील कमाई जाणून घ्या

सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या (Sacknilk Entertainment) रिपोर्टनुसार चित्रपटाच्या ओपनिंग डे लाच चित्रपटाने 1.05 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 2.3 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 3.2 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 1 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 1.45 कोटी रुपये, सहाव्या दिवशी 1.8 कोटी रुपये आणि सातव्या दिवशी 1.6 कोटी रुपयांची कमाई केली.

पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने 12.4 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आठव्या दिवशी 2.35 कोटी रुपये, नवव्या दिवशी 5.4 कोटी रुपये आणि दहाव्या दिवशी 6.20 कोटी रुपयांची यशस्वी कमाई बॉक्स ऑफिसवर केली. या दहा दिवसांत चित्रपटाने एकूण 26.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

चित्रपटाचे बजेट जाणून घ्या

'बाईपण भारी देवा'  (Baipan Bhari Deva) या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. प्रत्येक कुटूंबात केवळ याच चित्रपटाची चर्चा ऐकायला मिळत आहे. यापूर्वी आलेल्या रितेश देशमुखच्या वेड चित्रपटानंतर 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. त्यामुळेच प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहत आहेत. हा चित्रपट 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी बाईपण भारी देवाने चित्रपटाचे बजेट क्रॉस केले आहे.