Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI Innovation Hub: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅक्सिस बँकेने सुलभ लोनसाठी लाँच केले दोन प्रोडक्ट, वाचा सविस्तर

RBI Innovation Hub: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅक्सिस बँकेने सुलभ लोनसाठी लाँच केले दोन प्रोडक्ट, वाचा सविस्तर

Image Source : www.business-standard.com

ग्राहकांना लोन घेताना अडथळ्यांचा सामना करावा लागू नये आणि त्याना झटपट लोन मिळावे यासाठी आरबीआय सर्व प्रयत्न करत आहे. आरबीआयला (RBI) सोबत म्हणून आता Axis बँकेने यात प्रवेश केला असून दोन प्रोडक्ट लाँच केली आहेत. चला तर त्याविषयी जाणून घेऊया.

RBI Innovation Hub: खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रिक्शनलेस क्रेडिटचा (PTPFC) पाठिंबा असलेल्या किसान क्रेडिट कार्ड आणि MSME लोन ही दोन प्रोडक्ट लाँच केली आहेत. रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबद्वारे (RBIH)  PTPFC या पायलट प्रोजेक्टची घोषणा 17 ऑगस्टला करण्यात आली होती. RBIH ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मालकीची उपकंपनी आहे. तसेच, या प्रोजेक्टमध्ये ही दोन प्रोडक्ट लाँच करून अ‍ॅक्सिस बँकेने पहिला नंबर पटकावला आहे. याचबरोबर हे प्रोडक्ट पूर्णपणे डिजिटल असल्याने ग्राहकांना आता लोन घेताना पेपर्सची आवश्यकता लागणार नाही.

MSME लोन 10 लाखांपर्यत उपलब्ध

Axis Bank किसान क्रेडिट कार्ड (KCC) आणि असुरक्षित MSME लोन देणार आहे. RBI ने लेंडर्सना आवश्यक डिजिटल माहिती सुलभरित्या उपलब्ध करून देण्याची घोषणा आधीच केली आहे. त्यामुळे त्या माहितीचा या लेंडर्संना लोन देताना उपयोग होणार आहे. हे नवे प्रोडक्ट डिजिटल असल्याने, ग्राहकांना लोन घेताना कोणतेही पेपर्स देण्याची आवश्यकता राहणार नाही आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून किसान क्रेडिट कार्ड सध्या मध्य प्रदेशात दिले जात असून ग्राहकांना त्यावर 1.6 लाखापर्यंत लोन उपलब्ध असणार आहे. तसेच, MSME लोन देशभर उपलब्ध असणार आहे आणि याद्वारे बँक ग्राहकांना 10 लाखापर्यंत लोन देणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

लोन मिळेल सहज

पायलट प्रोजेक्टचा भाग म्हणून, अ‍ॅक्सिस बँक PTPFC चा लाभ घेऊन, ग्राहकांच्या पूर्ण संमतीने आणि सुरक्षित मार्गाने डेटा अ‍ॅक्सेस करणार आहे. यामध्ये ग्राहकाचा पॅन व्हेरिफिकेशन, सॅटलाईट डेटा, जमिनीच्या नोंदी इत्यादी महत्वाच्या डेटाचा समावेश असणार आहे. हा सर्व डेटा प्रमाणित सोर्सकडून मिळणार असल्याने ग्राहकांना लोन मिळणे सहज होणार असल्याची अपेक्षा बॅंकेने व्यक्त केली आहे.

आणखी प्रोडक्ट होईल लाँच

या पायलट प्रोजेक्टवरून जी माहिती मिळेल तिच्या आधारावर बँक प्रोडक्टची व्याप्ती वाढवेल आणि प्लॅटफॉर्मवर नवीन प्रोडक्ट टप्प्याटप्प्याने लाँच करणार आहे. ही प्रोडक्ट सेल्फ सर्व्ह आणि असिस्टेड अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असणार आहेत. यामुळे जास्तीतजास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असे बँकेने म्हटले आहे.