Axis MCLR Rate: ॲक्सिस बँकेने मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेटमध्ये (Marginal Cost Lending Rate-MCLR) 0.5 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. यामुळे ॲक्सिस बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्जामध्ये वाढ होणार आहे. कर्जदारांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे.
भारतातील खासगी आणि मोठी बँक म्हणून ॲक्सिस बँकेची ओळख आहे. या बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेटमध्ये वाढ करून कर्जदार ग्राहकांना झटका दिला आहे. बँकेने MCLR मध्ये 0.5 बेसिस पॉईंटने वाढ केली. बँकेच्या या निर्णयामुळे होम लोन, पर्सनल लोन आणि कार लोन बरोबरच सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे ज्यांचे सध्या कर्ज सुरू आहे. त्यांच्या ईएमआय किंवा लोन कालावधीमध्ये वाढ होणार आहे.
बँकेचा MCLR दर काय आहे?
ॲक्सिस बँकेचा नवीन एमसीएलआर दर 8.95 ते 9.30 टक्के यादरम्यान असेल. एका दिवसाचा आणि किमान महिन्याभराचा एमसीएलआर दरामध्ये 5 बीपीएस पॉईंटने वाझ करून तो 8.95 टक्के केला आहे. जो यापूर्वी 8.90 टक्के होता. 3 आणि 6 महिन्यांचा एमसीएलआर दर अनुक्रमे 9 आणि 9.05 टक्के होता. त्यात 5 बेसिस पॉईंटने वाढ करून तो अनुक्रमे 9.05 आणि 9.10 टक्के करण्यात आला आहे.
एक वर्षाचा एमसीएलआर दर 9.10 टक्के होता, तो वाढवून 9.15 टक्के करण्यात आला आहे. त्यानंतर 2 वर्षांचा एमसीएलआर दर 9.20 वरून 9.25 टक्के आणि 3 वर्षांचा एमसीएलआर दर 9.25 वरून 9.30 टक्के करण्यात आला आहे.
मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट (MCLR) हा बँकेचा कर्जाचा किमान दर असतो. एमसीएलआर रेटपेक्षा कमी रेटने बँकांना कर्ज देता येत नाही. आरबीआयने (RBI) 1 एप्रिल, 2016 पासून MCLR देण्यास सुरुवात केली. एमसीएलआरमध्ये बँकांनी वाढ केली की, कर्जाचा व्याजदर वाढतो. त्याचप्रमाणे MCLR मध्ये घट झाली की, कर्जाचा दर देखील कमी होतो. सध्या अॅक्सिस बँकेच्या कर्जदारांचे कर्ज मात्र महागले आहे.