शेअर मार्केटमध्ये काय करायचे असते, हे तर सर्वांनाच माहिती असते. शेअर्स विकत घ्यायचे, फायदा मिळवायचा आणि नंतर पुन्हा ते विकायचे. हे सगळं इतकं सोपं असताना तोटा होतोच कसा मग? अनेकवेळा आपल्याला काय करायचे आहे हे माहिती असते. पण काय करायचे नाही हे माहिती नसते आणि त्यामुळेच अडचण निर्माण होते आणि नुकसान सहन करावे लागते. शेअर मार्केटचे हे साधं गणित आहे. गुंतवणूकदाराने काय नाही केले पाहिजे हे जाणून घेतल्याने गुंतवणूक अजून चांगली व फायदेशीर ठरू शकते. याबाबत फिलिप फिशर (Philip Fisher) यांनी आपल्या कॉमन स्टॉक्स अनकॉमन प्रोफिट्स (Common Stocks Uncommon Profits) या पुस्तकात विस्तृतपणे सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात की, गुंतवणूकदाराने अशा कोणत्या 4 गोष्टी आहेत; ज्या त्याने केल्या नाही पाहिजेत.
Table of contents [Show]
डायव्हर्सिफिकेशनचा ताण घेऊ नका (Don't stress about diversification)
डायव्हर्सिफिकेशन ही गुंतवणुकीतील एक महत्त्वाची गोष्ट आहे. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट (गुंतवणूक) करणाऱ्या प्रत्येकाने डायव्हर्सिफिकेशनचा विचार केलाच पाहिजे. पण डायव्हर्सिफिकेशन करताना ओव्हर डायव्हर्सिफिकेशन देखील करू नये. अनेक जण शेअर्स फक्त डायव्हर्सिफिकेशन या एका उद्देशामुळेत घेतात; जे चुकीचे आहे. जर एखाद्या कंपनीबद्दल पूर्ण माहिती नसेल तर ती घेणं तेही केवळ लोकांनी नियम बनवलाय म्हणून, खरंच मूर्खपणा आहे. तुम्ही घेतलेल्या एखाद्या कंपनीच्या स्टॉकमध्ये जर अस्थिरता असेल तर नक्कीच डायव्हर्सिफिकेशनचा विचार करणे गरजेचे आहे. डायव्हर्सिफिकेशन करताना तुम्ही खालील काही नियमांचा वापर करू शकता.
- एकूण गुंतवणूकीपैकी 20 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक कोणत्याही एक कंपनीत करू नये.
- एकूण गुंतवणूकीपैकी 5 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक कोणत्याही स्मॉल कॅप किंवा हाय रिस्क कंपन्यांमध्ये करू नये.
- भरपूर स्टॉक घेतले म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन झाले असे होत नाही. त्यामुळे विचार करून आणि अभ्यास करून शेअर्स घेणे महत्त्वाचे आहे.
कंपनीची कसून माहिती काढायला विसरू नका (Do Research Thoroughly)
एखाद्या कंपनीचा शेअर्स विकत घेताना त्याची फक्त किंमत पाहणे अयोग्य आहे. कंपनीची किंमत कधीच तिच्या आजच्या व्यावसायावर वर अवलंबून नसते. ती कायम कंपनीच्या भविष्यातील नियोजनावर अवलंबून असते. त्यामुळे कंपनीचा चार्ट बघताना जर फक्त P/E रेशो (Price to Earnings Ratio) किंवा वॉल्युम किंवा कंपनीची सेल्स व गुंतवणूक पाहून इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ते चुकीचे ठरू शकते. कंपनीचा संपूर्ण अभ्यास केल्याने एखाद्या कंपनीचा शेअर घ्यायचा की नाही या अंतिम निकषावर कोणत्याही शंकांशिवाय पोहोचता येते. त्यामुळे चार्ट बघताना सर्व घटकांचा अभ्यास करण्याची सवय ठेवा.
शेअर्स घेताना किमतीबरोबर वेळेचेही भान ठेवणे आवश्यक! Always Aware of Time as well as Price!)
शेअर्स विकत घेताना तो योग्य किमतीसोबतच योग्य वेळी विकत घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ जर टाटाचा एखादा शेअर 300 रुपयांमध्ये असेल व त्याच्या भविष्याबद्दल मार्केटमध्ये चांगली चर्चा होत असेल. पण तुम्ही त्यावर ठाम नसाल तर तो शेअर न घेणेच उत्तम आहे. तुम्ही त्या शेअर्सच्या पुढील तिमाही अहवाल येईपर्यंत वाट पाहू शकता किंवा जर त्या सेक्टरमध्ये चांगला परफॉर्मन्स असेल तर तुम्ही त्यामध्ये उतरू शकता. योग्य वेळेसाठी योग्य किमतीला नाकारणे हा योग्य निर्णय ठरू शकतो.
गर्दीला फॉलो करू नका! (Don't follow the crowd!)
शेअर्सची किंमत कधीच केवळ चांगल्या गोष्टींमुळे कमी जास्त होत नाही. अनेकवेळा त्यामधल्या नकारार्थी गोष्टींचा देखील समावेश असतो. अनेक खोट्या बातम्या व अफवांमुळे किमतींमध्ये बदल होत असतात. अशावेळी जर इतर गुंतवणूकदार शेअर्स विकत असतील तर शेअर्स विकायचा आणि काही गुंतवणूकदार शेअर्स विकत घेत असतील तर ते विकत घ्यायचे, असे करणे चुकीचे ठरू शकते. जोवर तुम्हाला त्याबाबत खात्री वाटत नाही तोपर्यंत त्यावर रिऍक्ट होऊ नका. अनेकवेळा मार्केट मॅनिप्युलेट करण्यासाठी देखील अशा काही चुकीच्या गोष्टी केल्या जातात. ज्याला बळी पडून काही जण आपली पोझिळन बदलत आणि नंतर त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे अशा परिस्थितीत विचार करून निर्णय घेणे अगदी उत्तम ठरू शकते.