Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Payment: युपीआय ट्रान्झॅक्शन वाढले अन् चेकची देवाण-घेवाण घटली, एटीएमचा वापर कमी झाला!

Online transactions have increased

UPI Payment: सबकुच ऑनलाईन म्हणत, आता आपण आपल्याच नकळत सर्व व्यवहारही ऑनलाईन करू लागले आहोत. ऑनलाईन व्यवहार करत असल्यामुळे एटीएममधून रोखे काढण्याचे प्रमाण घटले आहे तर दुसरकीकडे चेक देवाण-घेवाण कमी झाली आहे. येत्या काळात हे प्रमाण अधिक खालावणार आहे, असे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि फोन पे यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. आणखी काया काय या अहवालात म्हटले आहे ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

UPI Transaction: क्यूआर कोड, युपीआय, डेबिट कार्ड टॅप करून किंवा स्वाईप करून कुठेही सहज पेमेंट केले जाते. आता कोणत्याही व्यक्तीने वॉलेट न घेता केवळ मोबाईल घेऊन घराबाहेर पडले तरी वाण-सामान, भाजी, इतर खरेदी करून  पब्लिक ट्रान्सपोर्टने परत येऊ शकते. कारण सगळीकडे ऑनलाईन पेमेंट करण्याचे माध्यम उपलब्ध आहेत. ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण वाढल्यामुळे सध्या चेकची देवाण-घेवाण कमी झाली आहे, कॅशचा व्यवहार काही अंशी कमी झाला आहे. तर, येत्या चार-पाच वर्षांत देशात चेक आणि एटीएमद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या खूपच कमी होणार आहे, असे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि फोन पे यांच्या अहवालात सांगण्यात आलेले आहे. या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2026 पर्यंत, चेक आणि एटीएमद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या देशातील एकूण व्यवहारांच्या 1 टक्क्यांपेक्षा कमी राहू शकते.

ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण वाढले (Online transactions have increased)

देशातील वेगाने वाढणारे डिजिटल व्यवहार हे यामागचे खरे कारण असल्याचे मानले जात आहे. डेटा दर्शवितो की आर्थिक वर्ष 2019 मध्ये, जेथे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसने (UPI: Unified Payments Interface) देशातील एकूण पेमेंटपैकी 16 टक्के पेमेंट केले होते, तर  2022 या आर्थिक वर्षात तब्बल 63 टक्के व्यक्तींनी युपीआयद्वारे पेमेंट केले आहे. याचाच अर्थ, नागरिकांचा ऑनलाईन पेमेंट करण्याकडे कल वाढला असल्याचे दिसून आले आहे.

आर्थिक वर्ष 2019 मध्ये एकूण व्यवहारांपैकी एटीएमद्वारे रोखीचे व्यवहार 29 टक्के होते, जे आर्थिक वर्ष 2022 मध्ये हेच प्रमाण टक्क्यांवर गेले आहे.  म्हणजेच, तीन वर्षात तब्बल 25 टक्क्यांनी एटीएमधून रोख रक्कम काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे.  यासोबतच धनादेशाद्वारे होणारे पैशांचे व्यवहार या काळात 3 टक्क्यांनी घटले असून ते 1 टक्क्यावर आले आहे. जानेवारी-मार्च 2022 दरम्यानच्या कालावधीत, युपीआय (UPI) व्यवहार यूपीमध्ये 235 टक्के, उत्तराखंडमध्ये 216 टक्के, हरियाणामध्ये 212 टक्के, बिहारमध्ये 248 टक्के, झारखंडमध्ये 266 टक्के आणि दिल्लीमध्ये 210 टक्क्यांनी वाढले आहेत.

फोनपेच्या (PhonePe) आकडेवारीनुसार, अनेक तिमाहींमध्ये युपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च 2021 पर्यंत युपीआयद्वारे 345 कोटींहून अधिक व्यवहार झाले. या व्यवहारांमध्ये 6.28 लाख कोटी रुपयांचा समावेश होता. त्याची सरासरी 1 हजार 818 रुपये प्रति व्यवहार होत असल्याचे दिसून आले आहे.

बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे एमडी म्हणाले की, आम्ही केलेल्या संशोधनानुसार, ही आकडेवारी आणि सध्याच्या ट्रेंडच्या आधारे असे मूल्यांकन केले आहे की 2026 वर्षापर्यंत चेक आणि एटीएमद्वारे होणारे व्यवहार एकूण आकडेवारीच्या एक टक्काही असणार नाही. यूपीआयच्या माध्यमातून देशात लहान ते मोठे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. अशा परिस्थितीत सध्या साधारणपणे 2 लाख  55 हजार एवढ्या एटीएम मशिन असूनही त्यांचा वापर सातत्याने कमी होतान दिसत आहे.