Disclaimer Guidelines: टीव्हीवर तुम्ही अनेक जाहिराती पाहिल्या असती ज्यामध्ये शेवटी सूचना म्हणजेच डिस्क्लेमर दिले जाते. मात्र, हे डिस्क्लेमर इतक्या जलद सांगितले जाते की, दर्शकांना ते काहीही समजत नाही. तसेच काही वेळा खूप लहान अक्षरात सूचना खालच्या बाजूला लिहलेली असते. ज्याची अक्षरे इतकी छोटी असतात की, त्याचा काहीही बोध जाहिरात पाहणाऱ्याला होत नाही. एखादे उत्पादन सेवा खरेदी करण्यामधील धोके ग्राहकाला माहिती पाहिजे, मात्र, तसे होत नाही. ही माहिती जाहिरातदारांकडून दडवली जाते. म्हणूनच जाहिरात नियामक संस्थेने नियम कठोर केले आहेत.
अॅडव्हर्टायजिंग काऊंन्सिल ऑफ इंडिया (ASCI) ही सेल्फ रेग्युलेटेड संस्था जाहिरात प्रदर्शित करण्याबाबतची सर्वोच्च बॉडी आहे. याद्वारे जाहिरात दाखवण्याचे नियम काय आहेत, हे कंपन्यांना आखून दिले जातात. अनेक वेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा खोटा दावा करणाऱ्या जाहिरातींवर प्रदर्शनाचे निर्बंध या संस्थेकडून लादण्यात आले आहेत.
काय आहेत नवे नियम? (ASCI new Disclaimer Guidelines)
1)जाहिरातींमध्ये देण्यात आलेला डिस्क्लेमर ठळक अक्षरात असावा.
2)डिस्क्लेमरची एक ओळ किमान चार सेकंद स्क्रिनवर ठेवावी.
3)सुचनेची हेडिंग साधी सोपी आणि सुटसुटीत असावी
4)एकापेक्षा जास्त डिस्क्लेमर नसावे.
5)जास्तीत जास्त दोन ओळींमध्ये सुचना असावी. प्रत्येक ओळ चार सेकंद स्क्रिनवर राहायला हवी.
6)ऑडिओ जाहिराती किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या जाहिरातींना हे नियम लागू असतील.
7)जाहिरातीमध्ये केलेला दावा उत्पादन आणि सेवेशी सुसंगत असावा. त्यामध्ये स्पष्टता असावी, अस्पष्ट माहिती असता कामा नये.
8)जाहिरात ज्या भाषेत आहे त्याच भाषेत डिस्क्लेमर लिहलेले असावे. दोन भाषांमध्ये जाहिरात असेल तर दोन्हीही भाषांमध्ये डिस्क्लेमर द्यावे.
नवे नियम बनवण्याची गरज का पडली? (Why there is need of Disclaimer Guidelines)
ASCI या संस्थने टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या सुमारे 800 जाहिरातींचा अभ्यास केला. त्यामध्ये नियमांचा भंग केल्याचा आढळून आले आहे. या जाहिरातींपैकी सुमारे 80% जाहिरातींमध्ये दर्शकांना डिस्क्लेमर दिसून आले नाही. 33% दर्शकांना डिस्ल्केमर स्पष्ट शब्दात दिसून आले नाही. जाहिरातींमध्ये देण्यात आलेले डिस्क्लेमर खूप लांबलचक आणि किचकट असल्याचे 62% दर्शकांनी म्हटले.