Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Toyota Hydrogen Car: हायड्रोजनवर चालणाऱ्या कार निर्मितीसाठी टोयोटाचे प्रयत्न

toyota hydrogen car test

टोयोटा कंपनीने नुकतेच करोला स्पोर्ट या गाडीला हाड्रोजन इंधनावर चालवण्याची चाचणी घेतली. त्यासाठी विशेष हायड्रोजन इंधनावर चालणारे कंम्बशन इंजिन तयार करण्यात आले. इंटरनल कंम्बशन इंजिनला विरोध नाही तर त्यातून बाहेर पडणाऱ्या कार्बनमुळे प्रदूषण होते. त्यामुळे हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आल्या तर प्रदूषण होणार नाही.

जगभरातील अनेक देशांकडून प्रदूषणासंबंधीचे नियम कठोर करण्यात येत आहेत. कार्बनच्या उत्सर्जनावर कठोर निर्बंध आल्यामुळे वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्या इलेक्ट्रिक वाहने निर्मिती करण्याच्या स्पर्धेत उतरले आहे. अनेक आघाडीच्या कंपन्यांनी EV श्रेणीतील वाहने निर्मितीसाठी भविष्यातील योजना आखल्या आहेत. मात्र, या सर्वांमध्ये जपानमधील टोयोटा कंपनी हायड्रोजनवर चालणारी कार बाजारात आणण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच इतरही पर्यायांचा विचार केला पाहिजे, असे कंपनीचे म्हणणे आहे

हायड्रोजनवर चालणाऱ्या कंपनीची चाचणी

टोयोटा कंपनीने नुकतेच करोला स्पोर्ट या गाडीला हाड्रोजन इंधनावर चालवण्याची चाचणी घेतली. त्यासाठी विशेष हायड्रोजन इंधनावर चालणारे कंम्बशन इंजिन तयार करण्यात आले. इंटरनल कम्बशन इंजिनला विरोध नाही तर त्यातून बाहेर पडणाऱ्या कार्बनमुळे प्रदूषण होते. त्यामुळे हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आल्या तर प्रदूषण होणार नाही. मात्र, कम्बशन इंजिन तंत्रज्ञान जिवंत राहील. इलेक्ट्रिक वाहनांना तो एक पर्याय ठरेल.

आपण फक्त एकाच तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करायला नको. आपला शत्रू कार्बन आहे. गाडीचे कम्बशन इंजिन नाही. जे तंत्रज्ञान आपण आधीपासून वापर आहोत आहोत, त्याचा वापर करुन आपण विचार आधी करायला हवा. कार्बन न्युट्रॅलिटी म्हणजे फक्त एकच पर्याय निर्माण करा, असे नाही तर इतरही पर्यायांवर काम करायला हवे, असे टोयोटा कंपनीचे व्हाइस चेअरमन सिंगेरु हायोकावा यांनी म्हटले.

इलेक्ट्रिक कारसोबतच हायड्रोजन कारवरही संशोधन

२०२५ पर्यंत टोयोटा कंपनी १५ इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणणार आहे. यासाठी कंपनीने साडेतेरा बिलियन डॉलर गुतंवणूक केली आहे. यामध्ये बॅटरी निर्मिती प्रकल्पाचाही समावेश आहे. मात्र, फक्त EV नाही तर हायड्रोजनवर चालणाऱ्या गाडी निर्मितीवरही कंपनी लक्ष देत आहे. २०४० पर्यंत जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या गाड्या निर्मिती न करण्याच्या करारावर मर्सडिज, जनरल मोटार, फोर्ड कंपन्यांनी सह्या केल्या आहेत. मात्र, टोयोटा आणि वोक्सवॅगन कंपन्यांनी या करारावर सह्या केल्या नाही. हायड्रोजन इंधनाचा इंटरनल कंम्बशन इंजिनमध्ये वापर करून गाडी चालवण्यासाठी टोयोटा प्रयत्नशील आहे.

तंत्रज्ञान निर्मितीचे आव्हान

हायड्रोजनवर चालणारी कार निर्मितीसाठी टोयोटा कंपनी तयार असली तरी हे तंत्रज्ञान स्वस्तात उपलब्ध करणे आव्हानात्मक आहे. जर परवडणाऱ्या किंमतीत गाडी निर्मिती झाली नाही तर मागणीही कमी राहू शकते. तसेच हायड्रोज इंधन वापरामुळे पूर्णत: कार्बन उत्सर्जन थांबणार नाही. झिरो कार्बन एमिशन कार म्हणता येणार नाही. हायड्रोजन इंधन गाडीमध्ये वापरण्यासाठी प्रेशराइज्ड टाकीचा वापर करावा लागतो. मात्र, त्यामुळे गाडीचा मोठा भाग टाकीने व्यापतो.