A.R. Rahman: 'द मोझार्ट ऑफ मद्रास' म्हणून प्रसिद्ध असलेले एआर रहमान यांचे गाणे जुने असले तरी सध्या सोशलमिडीया मोठया प्रमाणात ऐकायला मिळत आहे. ‘ए हसी वादिया’ या गाण्याने तर इंन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे. मात्र आज या गायकाने आपल्या आवाजाने करोडो प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अशा या महान गायकाच्या कमाईबाबत जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
रोजासाठी 25 हजार मानधन (25 Thousand Salary for Roja)
1992 मध्ये रोजा या चित्रपटातील गाण्यांना संगीत देणाऱ्या ए. आर. रहमान यांना फक्त 25 हजार रुपये इतके मानधन मिळाले होते. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. या चित्रपटानंतर ते बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाले. आज ही या चित्रपटातील गाणी तरूणवर्ग मोठया उत्साहाने ऐकतो. त्यांच्या याच संगीतच्या जादूने ते आज जगातील सर्वात श्रीमंत संगीतकारांपैकी एक आहे.
लंडन आणि अमेरिकेत ही एक स्टुडिओ (A studio in London and America)
गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते अनेकदा हॉलिवूडमध्ये जातात. टूर दरम्यान ते एलए अपार्टमेंटमध्ये राहतात. TOI नुसार, रहमान यांच्याकडे एक अपार्टमेंट आहे, ज्यामध्ये त्याचा स्टुडिओ देखील आहे. तसेच मुंबई, लंडन आणि लॉस एंजेलिसमध्ये ‘केएम’ म्युझिक स्टुडिओ नावाचे अनेक स्टुडिओदेखील आहेत.
महागड्या गाडया (Expensive Cars)
ए.आर.रहमान यांच्याकडे अनेक लक्झरी गाडया आहेत. त्यांच्या पार्किंगमध्ये अनेक आलिशान गाडया पाहायला मिळतात. ज्यामध्ये 93.87 लाख रुपयांची व्होल्वो एसयूव्ही, 1.08 कोटी रुपयांची जॅग्वार आणि 2.86 कोटी रुपयांची मर्सिडीज या महागडया गाडयांचा समावेश आहे. सेलिब्रिटी नेट वर्थनुसार, त्यांची एकूण संपत्ती $280 दशलक्ष आहे, जी अंदाजे 2100 कोटी रुपये आहे.
एका तासासाठी किती चार्ज घेतात? (How much do you Charge for an Hour)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एआर रहमान एका चित्रपटात संगीत देण्यासाठी 8 ते 10 कोटी रुपये घेतात. त्याचप्रमाणे लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्यासाठी तासाला 3 ते 5 कोटी रुपये घेतात. देशातील मोठ्या शहरांमध्ये त्याचे आलिशान बंगले आहेत आणि लॉस एंजेलिसमधील एका आलिशान अपार्टमेंटचाही समावेश आहे.