आयफोनची निर्मिती करणारी ॲपल कंपनी Apple Watch Series 9 ही अपडेटेड फिचर घेऊन आली आहे. ॲपलच्या दाव्यानुसार यातील नवीन चीप ही 60 टक्के वेगवान असून यात 30 टक्के वेगवान GPU चा समावेश आहे. विशेष म्हणजे या नवीन वैशिष्ट्यांसह हेल्थ डेटा ॲक्सेस, जवळच्या युजरबरोबर माहिती शेअर करण्यासाठी नेम ड्रॉप आणि वॉच कंट्रोलसाठी डबल टॅप यांचा समावेश आहे. नवीन ॲपल वॉच सिरीज 9 ही क्यूपर्टिनो जायंटने लॉन्च केलेल्या स्मार्टवॉचच्या मालिकेतील दहावी आवृत्ती आहे. नवीन मॉडेल्स Apple Watch Series 8 सारखेच आहे. परंतु यात काही नवीन अपडेटेड फीचर्सचा समावेश आहे.
Apple Watch Series 9
ॲपल वॉच सिरीजमधून ग्राहकांना एकाचवेळी 9 जणांचा फोन घेण्याची सुविधा देते. त्याचबरोबर सोयीनुसार कॉल डिस्कनेक्ट करणे, टायमर सेट करणे आदी सुविधाही यामध्ये देण्यात आल्या आहेत. याचा ब्राईटनेस 2,000 नीट्स इतका आहे. ॲपलचा दावा आहे की, हे स्मार्टवॉच एकदा चार्ज केल्यानंतर सलग 18 तास सुरू राहू शकते. ही नवीन 9 सिरीज गुलाबी रंगामध्ये उपलब्ध आहे. हे वॉच दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असून 41 एमएम आणि 45 एमएम आकारात स्टार लाईट, लाईट सिल्वर, लाल आणि नवीन गुलाबी अल्युमिनियम केस तसेच सोने चांदी आणि ग्राफाईट केसमध्ये आणि स्टेननेस स्टीलमध्ये देखील उपलब्ध आहे. नवीन आरामदायी स्पोर्ट बँडसह जोडलेले हे घड्याळ कार्बन न्यूट्रल म्हणजेच पर्यावरण पूरक असल्याचा कंपनीचा दावा आहे. Apple Watch Series 9 ची सुरुवात 41,900 रुपयांपासून होते.
Apple Watch Ultra 2
वॉच नाईन सीरीज बरोबरच ॲपलने मागच्यावर्षी इंट्रोड्यूस केलेल्या ॲपल वॉच अल्ट्राचे अपडेटेड व्हर्जन देखील जाहीर केले आहे. यात कस्टमाईझ करता येण्याजोगा घड्याळाचा पॅटर्न, व्यायामाचे वेळी आवश्यक डेटा कलेक्शनसाठी power zone उपलब्ध असेल. Apple Watch Ultra 2 मध्ये सुधारित रेटिना डिस्प्लेसह 49mm केस आहे . हे घड्याळ 3,000 नीट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देते. Apple Watch Series 9 प्रमाणे Apple Watch Ultra 2 देखील कंपनीच्या कस्टम S9 SiP वर चालते . फ्लॅगशिप स्मार्टवॉच ऑन-डिव्हाइस, सिरी प्रोसेसिंग आणि सुधारित लोकेशन ट्रॅकिंग यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह हे घड्याळ येते. डबल टॅप नावाच्या नवीन कार्यक्षमतेसह, युजर एका हाताने आणि डिस्प्लेला स्पर्श न करता Apple Watch Ultra 2 नियंत्रित करू शकतात. गिर्यारोहक तसेच वॉटर स्पोर्ट्स प्रेमींसाठी हे घड्याळ अगदी योग्य आहे. कारण हे समुद्रसपाटीपासूनची उंची आणी पाण्याची खोली यांची योग्य माहिती देते.
Apple Watch Ultra 2 ची भारतातील किंमत रु 89,900 इतकी आहे.