Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple Launches New Homepad: ॲपलने लाँच केला 'हॉमपॉड 2', जाणून घ्या नव्या होमपॉडची किंमत आणि फिचर्स

Apple

Image Source : www.independent.co.uk

Apple Launches HomePod 2 : ॲपलने बुधवारी 18 जानेवारी 2022 रोजी नवीन होमपॉड 2 (Apple HomePod 2) लॉंच केला. नवीन होमपॉड ॲपलच्या इतर उपकरणांच्या तुलनेने मोठा असलेला एक दमदार स्मार्ट स्पीकर आहे.यात ॲपल ने नवीन तंत्रज्ञानासह सिरी (Siri) देखील उपलब्ध करून दिले आहे.

Apple Launches HomePod 2 : ॲपलने बुधवारी 18 जानेवारी 2022 रोजी नवीन होमपॉड 2 (Apple HomePod 2) लॉंच केला. नवीन होमपॉड ॲपलच्या इतर उपकरणांच्या तुलनेने मोठा असलेला एक दमदार स्मार्ट स्पीकर आहे.यात ॲपल ने नवीन तंत्रज्ञानासह सिरी (Siri) देखील उपलब्ध करून दिले आहे. ईमरसिव्ह स्पेशियल ऑडिओ ट्रॅक ॲवेलेबलिटी व ग्राऊंड ब्रेकिंग यासारखे प्रगत फीचर्स या स्पीकरमध्ये देण्यात आले आहे.
ॲपल होमपॉड 2 ची 18 जानेवारीपासून ॲपलच्या अधिकृत स्टोअरवरुन विक्री सुरू झाली आहे.

'ॲपल'च्या 'या' स्मार्टफोन्सशी होईल कनेक्ट 

नवीन होमपॅड आयफोन SE 2 या मोबाईलनंतर इतरच्या काही मोबईल्सशी होमपॉड सुसंगत असणार आहे. या होमपॉडमध्ये 100 दशलक्ष गाण्यांचा आस्वाद वापरकर्ते घेऊ शकतात. या होमपॉडमध्ये रेडिओची देखील सुविधा देण्यात आली आहे. वापरकर्ते या होमपॉडचा वापर करून सिरिद्वारे घराला नियंत्रित करू शकतात तसेच घरात धूर किंवा कार्बनमोनोक्साइडचे प्रमाण वाढल्यास अलार्मच्या माध्यमातून सूचना मिळेल. होमपॉडमध्ये डिप बास व उत्कृष्ट ऑडिओ क्लिरिटी आहे. ॲपल होमपॉड व्हाईट व मिडनाइट या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. नवीन होमपॉड 2 मध्ये वाय-फाय 2 मध्ये ब्लुटुथ 5.0, स्मार्ट लाइट कमी उर्जेचा वापर यासह इतर काही उपयुक्त फीचर्स देण्यात आले आहेत. या होमपॉडला आपण आयफोनशी कनेक्ट करून  मीडिया फाइल्स शेअर करू शकतात.    

ॲपल होमपॉड किंमत (Apple HomePod 2 Price)

भारतात असंख्य लोक ॲपल गॅजेट्स वापरतात. इतर कंपन्यांच्या तुलनेने ॲपलची उपकरणे महाग आहेत मात्र तरीही सॉफ्टवेअर व बनावट उत्कृष्ठ असल्यामुळे लोक ॲपल कंपनीची उपकरणे खरेदी करण्यास प्राधान्य देतात. ॲपलने नुकतेच होमपॉडचे लॉंचिंग केले असून होमपॉडची किंमत 32,900 रुपये इतकी आहे.