Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple iPhone 15 ची आजपासून भारतात विक्री सुरु, BKC येथील Apple Store मध्ये ग्राहकांची गर्दी

Apple iPhone 15

BKC Mumbai येथील ॲपल रिटेल स्टोअरच्या बाहेर काही नागरिक गेल्या 17-18 तासांपासून रांगा लावून उभे होते. आज सकाळपासून ॲपलने iPhone 15 सीरीज स्मार्टफोनची विक्री सुरु केली आहे. मुंबईत तर गुजरात, कर्नाटक आदी शेजारील राज्यांमधून आलेल्या ग्राहकांनी देखील हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

स्मार्टफोन ब्रँड ॲपलने आजपासून भारतात आयफोनचा बहुप्रतिक्षित iPhone 15 सीरीज स्मार्टफोनची विक्री सुरु केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या स्मार्टफोनची वाट बघणाऱ्या आयफोन प्रेमींसाठी ही एक खास संधी आहे. मुंबईतील आणि दिल्लीतील आयफोन स्टोअरच्या बाहेर आयफोन प्रेमींनी कालपासून रांगा लावल्या आहेत.

होय, बरोबर वाचलं तुम्ही, मुंबईतील बीकेसी येथील ॲपल रिटेल स्टोअरच्या बाहेर काही नागरिक गेल्या 17-18 तासांपासून रांगा लावून उभे होते. आज सकाळपासून ॲपलने iPhone 15 सीरीज स्मार्टफोनची विक्री सुरु केली आहे. मुंबईत तर गुजरात, कर्नाटक आदी शेजारील राज्यांमधून आलेल्या ग्राहकांनी देखील हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

पहिला स्मार्टफोन खरेदी करण्याची धडपड!

आता तुम्ही म्हणाल आजवर रेशन दुकानाच्या बाहेर, शाळा-कॉलेजच्या बाहेर प्रवेश मिळवण्यासाठी नागरिकांनी लावलेल्या रांगा तुम्ही पाहिल्या असतील, मात्र आता iPhone 15 सीरीज स्मार्टफोनची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र बघायला मिळते आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ॲपलने मोबाईल बुकिंगची सुविधा दिली असली तरी, तो मोबाईल प्रत्यक्षात ग्राहकांकडे कधी पोहोचेल याची खात्री नाही. त्यामुळे प्रत्यक्ष स्टोअरमध्ये जाऊन स्टोअरमधील पहिला स्मार्टफोन खरेदी करण्याची धडपड करताना युवावर्ग दिसतो आहे.

किंमत किती?

ॲपल आयफोन 15 (128 GB Storage) आणि ॲपल आयफोन 15 प्लस (128 GB Storage) यांची किंमत अनुक्रमे 79,900 रुपये आणि 86,900 रुपये इतकी आहे.

Apple iPhone 15 Pro (128 GB Storage) ची किंमत 1,34,900 रुपये इतकी आहे. तर Apple iPhone 15 Pro Max (128 GB Storage) 1,59,900 इतकी आहे.