Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Anupam Mittal Biography: शादी डाॅट.काॅमचे संस्थापक अनुपम मित्तल आहेत, 185 कोटी संपत्तीचे मालक

Anupam Mittal Biography

Image Source : http://www.hindustantimes.com/

Shark Tank India: शार्क टॅंक इंडिया 2 या बिझनेस रियालिटीची शो ची सध्या जोरदार चर्चा आहे. या शो ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच या कार्यक्रमाचे परिक्षक (जज) देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. यातील एक यशस्वी उद्योज 'अनुपम मित्तल' यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेवुयात.

Anupam Mittal Net Worth: यशस्वी बिजनेसमॅन अनुपम मित्तल (Anupam Mittal)  हे  shaadi.com चे संस्थापक आहेत. त्यांनी shaadi.com, makaan.com, मौज अॅप सारख्या अनेक वेबसाइट सुरू केल्या आहेत आणि संपूर्ण भारतामध्ये त्या यशस्वीरित्या कार्यरत आहेत. ते एक उद्योजक असून मोठे गुंतवणूकदार देखील आहे. त्यांनी चित्रपटांमध्येहीदेखील गुंतवणूक केली आहे. आज त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेवुयात. 

बालपण (Childhood)

यशस्वी बिझनेसमॅन अनुपम मित्तल यांचा जन्म 23 डिसेंबर 1971 रोजी मुंबई (Mumabi) या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोपाल कृष्ण मित्तल आणि आईचे नाव भगवती देवी मित्तल आहे. मुंबईतील डॉन बॉस्को येथे त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तर ते पुढील शिक्षणासाठी कॅनडाला गेले. त्यांनी बोस्टन कॉलेज, मॅकगिल युनिव्हर्सिटी येथून पदवी संपादन केली आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केले. आयआयएममधून एमबीए केल्यानंतर त्यांनी व्यवसायिक म्हणून पीपल ग्रुपने करियरची सुरूवात केली. जी आता  shaadi.com बनली.

बिझनेस करियर (Business Career)

आजच्या काळात त्यांच्या shaadi.com व makaan.com आणि  मौज हे मोबाईल अॅप आणि पीपल पिक्चर्स सारख्या वेबसाइट संपूर्ण भारतात प्रसिध्द आहे. Shaadi.com ची स्थापना सुरुवातीला Sagaai.com म्हणून अनुपम मित्तल यांनी 1997 मध्ये सुरू केली होती. या वेबसाइटने मागील 15 वर्षांत भारतात मोठे यश मिळवले आहे आणि ते विवाहासाठी एक व्यासपीठ बनले आहे. जगभरातून 30 कोटींहून अधिक युजर्स या वेबसाइटवर अपडेट असतात.

विवाह व संपत्ती (Marriage and Wealth)

अनुपम मित्तल यांनी 4 जुलै 2013 रोजी आंचल कुमार या मॉडेलशी लग्न केले. त्यांना एक एलिसा नावाची सुंदर मुलगी आहे. सध्या ते 185 करोड संपत्ती मालक आहेत.

कुठे केली गुंतवणूक (Where did you Invest)

अनुपम मित्तल यांनी 2007 मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यांनी बहुतांश गुंतवणूक स्टार्टअप्समध्ये केली आहे. त्यांनी 200 हून अधिक स्टार्ट-अप उपक्रमांमध्ये गुंतवणूक केली होती. यामध्ये इंटरएक्टिव्ह अॅव्हेन्यू, सेपियन्स अॅनालिटिक्स, बिग बास्केट, कॅफे झो, केटो, द्रुवा, प्रीटी सिक्रेट्स, टॅक्सस्पॅनर, पील वर्क्स, फरेई, प्रॉपटायगरयांचा समावेश आहे. तर बॉलिवूड चित्रपटांमध्येदेखील त्यांनी गुंतवणूक केली आहे.