iPhone 15 Price Leaked: अॅपलच्या प्रत्येक प्रोडक्टबाबत खूपच गोपनीयता पाळली जाते. पण गेल्या काही महिन्यांपासून अॅपल कंपनीच्या वेगवेळ्या प्रोडक्ट्सची माहिती लिक होत असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी आयफोनच्या 15 सिरीजची किंमत फुटल्याची सोशल मिडियामध्ये चर्चा आहे. यापूर्वी आयफोनच्या 15 व्या सिरीजचे फीचर्स लीक झाल्याची चर्चा होती. लीक झालेली बातमी खरे आहे की खोटी याची अधिकृत माहिती कळलेली नाही. पण या किमती ऐकून तुम्ही नक्कीच चकित व्हाल.
फोर्ब्स या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, अॅपलने iPhone 15 च्या सिरीजमध्ये प्रो आणि नॉन-प्रो मॉडेलमध्ये 300 डॉलर्सचा गॅप ठेवला आहे. iPhone 15च्या बेसिक मॉडेलची किंमत 799 डॉलर्सपासून सुरू होईल. तर iPhone 15 Plus 899 डॉलर्स, iPhone 15 Pro 1099 डॉलर्स आणि iPhone 15 Ultra ची किंमत 1199 डॉलर्स इतकी सांगण्यात येत आहे. या किमतींमध्ये फरक असण्याची शक्यता आहे. कारण काही वेबसाईटवर असे सांगितले जाते आहे की, iPhone 14 सिरीजमध्ये अॅप्पल कंपनीला अपेक्षित रिस्पॉन्स न मिळाल्याने कंपनी iPhone 15 ची सिरीज कमी पैशांमध्ये लॉन्च करणार असे सांगितले जात आहे. पण यामध्ये तितकेसे तत्थ दिसत नाही.
एकूणची आयफोन आणि अॅप्पल कंपनीची क्रेझ इतकी आहे की, या कंपनीबाबतची कोणतीही माहिती किंवा बातमी सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असते. काही वेबसाईटने Apple iPhone 15 Pro चे फीचर्स लिक झाल्याचे सांगून त्याचे नवीन फीचर्स सांगितले जात आहेत.
iPhone 15 Proचे संभाव्य फीचर्स
iPhone 14 Proच्या मॉडेलमध्ये जी फ्रेम देण्यात आली आहे. त्या स्टेनलेस स्टीलच्या फ्रेममध्ये थोडाफार बदल केला जाणार आहे. तसेच आयफोन15 प्रो मध्ये व्हॉल्यूम रॉकर्स आणि पॉवर बटणासाठी नवीन पॉवर बटण दिले जाणार आहे. तसेच यामध्ये दोन नवीन हॅप्टिक इंजिनदेखील दिले जाणार आहे.