Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Anarock Report : 2022 मध्ये चार लाखांहून अधिक घरे बांधून पूर्ण

Anarock Report

कोविड-19 महामारीनंतर, रिअल इस्टेट कंपन्यांनी (Real Estate) 2022 मध्ये देशातील सात प्रमुख शहरांमध्ये चार लाखांहून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण केले आहे, ज्यामुळे घरांच्या बांधकामाचा वेग वाढला आहे.

कोविड-19 महामारीनंतर, रिअल इस्टेट कंपन्यांनी (Real Estate) 2022 मध्ये देशातील सात प्रमुख शहरांमध्ये चार लाखांहून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण केले आहे, ज्यामुळे घरांच्या बांधकामाचा वेग वाढला आहे. सन 2017 नंतर हा आकडा सर्वाधिक आहे. मालमत्ता सल्लागार कंपनी अॅनारॉकने म्हटले आहे की 2022 मध्ये देशातील सात प्रमुख बाजारपेठांमध्ये 4.02 लाख घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, जे 2021 मधील 2.79 लाख घरांच्या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे. मात्र, 2020 आणि 2021 मध्ये घरांच्या बांधकामाच्या गतीवर कोविड-19 साथीच्या रोगाचा मोठा परिणाम झाला.

मुंबईत सर्वाधिक घरे बांधली : अहवाल

अॅनारॉकने (Anarock) ने हा डेटा दिल्ली-NCR, मुंबई महानगर प्रदेश, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्ये बांधलेल्या निवासी युनिट्सबाबत जारी केला आहे. 2022 मध्ये पूर्ण होणार्‍या घरांपैकी सर्वाधिक 1.26 लाख घरे मुंबई विभागात होती. 2021 मध्ये मुंबईत फक्त 70,500 घरे बांधून तयार होती. त्याच वेळी, गेल्या वर्षी दिल्ली-एनसीआर प्रदेशात 86,300 घरे बांधून पूर्ण झाली आहेत, जी 2021 मध्ये 86,590 पेक्षा किंचीत कमी आहेत. पुण्यात 84,200 युनिट्स बांधण्यात आली आहेत. बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये एकूण 81,580 निवासी युनिट्स पूर्ण झाली आहेत. कोलकातामध्ये हा आकडा 23,190 युनिट्स इतका आहे.

तज्ज्ञांनी काय कारण सांगितले?

अॅनारॉकचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले की, 2022 हे वर्ष भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी उज्ज्वल वर्ष ठरले आहे, जेव्हा विक्रीने 2014 ची उच्च पातळी ओलांडली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी विकासक घरांचे बांधकाम लवकर पूर्ण करण्यावर भर देत आहे. पुरी म्हणाले की 2023 मध्ये देखील 5.44 लाखांहून अधिक घरे बांधली जाण्याची अपेक्षा आहे. त्यापैकी सर्वाधिक 1,66,850 घरे दिल्ली-NCR प्रदेशात बांधली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबई विभागात 1.33 लाख घरे पूर्ण होऊ शकतात. याशिवाय, 2022 च्या अखेरीस, दिल्ली-एनसीआर प्रदेशात 98,290 निवासी युनिट्स अद्याप विकल्या गेल्या नाहीत आणि सध्याच्या गतीच्या आधारावर बिल्डरांना त्यांची विक्री करण्यासाठी सुमारे पाच वर्षे लागतील. विक्री मालमत्ता सल्लागार कंपनी PropTiger.com ने आपल्या ताज्या अहवालात ही माहिती दिली आहे.