Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FSSAI on curd : अखेर पाकिटावर वापरता येणार दह्याचं प्रादेशिक नाव, काय आहे नेमका वाद?

FSSAI on curd : अखेर पाकिटावर वापरता येणार दह्याचं प्रादेशिक नाव, काय आहे नेमका वाद?

FSSAI on curd : दही या उत्पादनाला प्रादेशिक शब्द आता वापरता येणार आहे. एफएसएसएआय (The Food Safety and Standards Authority of India) म्हणजेच अन्न सुरक्षा नियामकानं आपल्या आदेशात सुधारणा केलीय. दही या शब्दावरून तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) वाद निर्माण झाला होता, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. पीटीआयनं हे वृत्त दिलंय.

प्रादेशिक भाषेत वेगळी ओळख

दुधापासून तयार होणाऱ्या दह्याच्या पाकिटांवर केवळ दही हा शब्द छापण्याचा हा आदेश होता. यावा तामिळनाडूत मोठा विरोध झाला. या पाकिटांवर जे छापील लेबल आहे, त्याठिकाणी दही हा वापरला जात होता. मात्र विविध राज्यांत विविध भाषा बोलल्या जातात. दही या शब्दालाही प्रादेशिक भाषेत वेगळी ओळख आहे. त्यामुळे सरसकट दही हा एकच शब्द वापरण्यास किंवा पाकिटांवर छापण्यास राज्यांचा विशेषत: तामिळनाडूचा प्रखर विरोध पाहायला मिळाला. इंग्रजीसह प्रादेशिक भाषेतल्या नावांचाच वापर करण्यावर तामिळनाडू ठाम होते. त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.

निवेदनानंतर आदेशात सुधारणा

लेबलवरच्या कंसात इतर कोणत्याही प्रचलित प्रादेशिक सामान्य नावासह 'दही' हा शब्द वापरण्याची आता फूड बिझनेस ऑपरेटर्सला (FBOs) परवानगी आहे. विविध राज्यांत दह्याला विविध नावानं उच्चारलं जातं. जसं इंग्लिशमध्ये कर्ड, मराठी, हिंदीत दही, तमिळमध्ये तय्यीर, तेलुगुमध्ये पेरुगू अशा नावांचा वापर केला जातो. म्हणजे पाकिटावर 'दही' (दही) अशाप्रकारचा उल्लेख आता असणार आहे. यासंबंधीचं निवेदनच एफएसएसएआयनं काढलं आहे. फर्मेंटेड मिल्क प्रोडक्ट्सच्या मानकांमधून 'दही' हा शब्द वगळण्यात आला. त्याबद्दल निवेदनं प्राप्त झाली. विविध निवेदनांनंतर या आदेशात सुधारणा करण्यात आलीय.

मुख्यमंत्र्यांकडून संताप

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी यावर संताप व्यक्त केला होता. हिंदी लादण्याचा विरोध करत त्यांनी एक ट्विट केलं होतं. आमच्यावर हिंदी लादण्यात येत असल्याबद्दल नाराजी त्यातून व्यक्त करण्यात आली होती. आमच्या मातृभाषेची अशी अवहेलना करणाऱ्यांना दक्षिणेतून कायमचं हद्दपार करण्याचा इशारा देण्यात आला होता. कर्नाटक तसंच तामिळनाडूतल्या दूध महासंघांनी दही या शब्दासह कंसात प्रादेशिक शब्द वापरावा असा आग्रह धरला. तामिळनाडूचे दुग्धविकास मंत्री एस. एम. नसर यांनी माध्यमांना याविषयी सरकारची भूमिका सांगितली. एफएसएसएआयच्या सूचना राज्यात अंमलात आणल्या जाणार नाहीत. दह्याच्या पॅकेटवर 'तय्यीर'असं लेबल लावलं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दही या शब्दाचा तमिळ समतुल्य शब्द वापरण्यावर त्यांनी भर दिला होता. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं (FSSAI) या प्रखर विरोधाची दखल घेतली.  

मिळालं एफएसएसएआयच्या सहसंचालकांच्या स्वाक्षरीचं पत्र

कर्नाटक दूध महासंघाला यासंबंधी एफएसएसएआयच्या सहसंचालकांच्या स्वाक्षरीचं एक पत्र मिळालंय. दह्याच्या पाकिटांवर आता अशाप्रकारचं लेबल लावलं जाईल. दही (दही), दही (मोसारू), दही (झामुत दौड), दही (तय्यीर), दही (पेरुगू). दह्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या प्रादेशिक नामावलीवर आधारित हा आदेश देण्यात आला आहे.