After announcing that it would lay off 18,000 employees, Amazon's stock plummeted: जगप्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन (Amazon) कंपनीने, नुकतीच 18 हजार कर्मचाऱ्यांनी बजतर्फ करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर, कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. एका दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये 6 जानेवारीपर्यंत 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीने एका दिवसात 600 दशलक्ष युएस डॉलर्स म्हणजे 5 हजार 539 कोटी रुपये गमावले.
अॅमेझॉनच्या शेअर्सच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा संस्थापक बेझोस यांच्या निव्वळ संपत्तीवरही परिणाम झाला आहे. ब्लुमबर्गच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या संपत्तीत 675 कोटींची घट झाली आहे.
अब्जाधीश जेफ बेझोस यांची सध्या 108 अब्ज डॉलरची संपत्ती आहे आणि ते जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, भारतीय उद्योगपती आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी अॅमेझॉनच्या बेझोसला मागे टाकले होते, जे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.
अॅमेझॉन 18 हजार कर्माचाऱ्यांना घरी बसवणार! (Amazon'll lay off 18 thousand employees)-
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनने (Amazon) नुकतेच सांगितले की, 18 हजारहून अधिक नोकर्यांची पदे कमी कराव्या लागणार आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे कंपनीला आर्थिक मंदीचे चटके बसत असल्याने खर्च कमी करणे आवश्यक आहे. यासाठी हे पाऊल उचलले आहे. यामुळे जी पदे काढून टाकण्यात येणार आहेत, त्या पदांवरील कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे लागणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी जॅसी यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली होती. 18 जानेवारीपासून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
ही कपात कंपनीच्या 3 लाख कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे 6 टक्के असणार आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनीने 10 हजार व्यक्तींना बडतर्फ केले होते. त्यानंतर 2 महिन्यांनी 80 टक्क्यांनी आकडा वाढवत तब्बल 18 हजार जणांना कंपनी घरी बसवणार आहे. ही सर्वात मोठी बडतर्फची प्रक्रिया असणार आहे. अॅमेझॉनच्या जगभरातील 18 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे, यापैकी 1 हजार कर्मचारी भारतातील असणार आहेत, असे क्विंटने म्हटले आहे. मात्र याबाबत, अॅमेझॉन इंडियाचे प्रवक्ते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी जेसी यांनी कोणतेच स्पष्टीकरण दिलेले नाही.
अॅमेझॉनच्या घोषणेनंतर, अॅमेझॉनच्या शेअर्समध्ये घसरण सुरू झाली. काल, शुक्रवारपर्यंत 2 टक्क्यांची घसरण झाली होती. नोव्हेंबर महिन्यातही 10 हजार कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर अॅमेझॉनचे शेअर कोसळले होते. यावेळी जेफ बोझेस यांच्या ब्ल्यू ओरिजिन कंपनीतील गुंतवणुकदारांनी आपले गुंतवणूक मागे घेतली असल्याची बातमी वॉशिंग्टन पोस्टने दिली आहे.