Amazon Prime Shopping: ई-कॉमर्स कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ऑक्टोबर महिना मोठी पर्वणी असणार आहे. कारण या महिन्यात फ्लिपकार्टचा बिग बिलिअन डेज, अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल, मेशो फेस्टिव्ह सिझन अशा सर्व मोठमोठ्या कंपन्यांच्या ऑफर्स सेलमध्ये कमीतकमी किमतीत आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करता येणार आहे.
ऑक्टोबर महिन्यातील हा फेस्टिव्हल मूड पाहून अॅमेझॉनने अॅमेझॉन प्राईमचे नवीन व्हर्जन Amazon Prime Shopping आणले आहे. कंपनीने हे खास व्हर्जन फ्लिपकार्ट आणि त्यासारख्या इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आणले आहे. या नवीन फीचरचा वापर ग्राहकांना वर्षाला 399 रुपये भरून करता येणार आहे. अॅमेझॉन प्राईम शॉपिंग हे अॅमेझॉन प्राईमचे नवीन व्हर्जन आहे. यामध्ये ग्राहकांना फ्री शिपिंग, वन डे डिलिव्हरी आणि याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे मिळणार आहेत.
अॅमेझॉन प्राईम सब्स्क्रिप्शन 1499 रुपये
अॅमेझॉन प्राईम सब्स्क्रिप्शनआणि अॅमेझॉन प्राईम शॉपिंग या दोन वेगवेगळ्या सुविधा असणार आहेत. अॅमेझॉन प्राईम शॉपिंग मेंबरशीप घेतलेल्या ग्राहकांना प्राईम व्हिडिओ, म्युझिक, रिडिंग, गेमिंग आणि इतर मनोरंजनाच्या सुविधा मिळणार नाहीत. यासाठी ग्राहकांना अॅमेझॉन प्राईमचे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. त्याची एका वर्षाची फी 1499 रुपये आहे.
ई-कॉमर्स कंपन्यांकडून सब्स्क्रिप्शन ऑफर्स
जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांकडून सब्स्क्रिप्शन ऑफर्स आणल्या जात आहेत. यापूर्वी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी अशाप्रकारचे 499 रुपयांचे व्हिआयपी सब्स्क्रिप्शन मॉडेल (Flipkart VIP Subscription Model) आणले होते. पण हे सब्स्क्रिप्शन फक्त मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता आणि अशाप्रकारच्या मेट्रोसिटीपुरते मर्यादित होते. त्याचबरोबर अॅमेझॉनने बरेच दिवस झाले आहेत. अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप आणली आहे. प्राईम मेंबरशीपमधून अॅमेझॉन ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देत होते. आता त्यात आणखी काही सुविधांची वाढ करून अॅमेझॉनने 399 रुपयांत Amazon Prime Shopping स्कीम आणली आहे.