Amazon Great Republic Day Sale, 2023: नवीत वर्ष सुरु झाल्यावर, न्यू ईयर सेल, विंटर सेल सुरू झालेले आहेत. त्यात आता अॅमेझॉनने दरवर्षीप्रमाणे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिपब्लिक डे सेलची घोषणा केली आहे. हा सेल 19 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये कपड्यांवर 50 टक्क्यांहून अधिक सवलत मिळणार आहे. आयफोन (iPhone), वनप्लस (OnePlus), सॅमसंग (Samsung), रिअलमी (Realme), शाऊमी (Xiaomi), विवो (Vivo), ओप्पो (Oppo) आदी स्मार्टफोन ब्रँड्सवर मोठ्या प्रमाणात सवलती मिळणार आहेत. तर, प्राईम ग्राहकांना विशेष सवलती देणार आहेत.
कोणत्या वस्तूंवर मिळेल सूट? (On which items the suit will be available?)
या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, उपकरणे आणि बरेच काही समाविष्ट आहे. या सेलमध्ये कमीत कमी 500 रुपयांपासून वस्तू मिळणार आहेत. तर सवलत 75 टक्क्यांपर्यंत मिळणार आहे. खास स्मार्टफोनवर 23 टक्क्यांपासून ते 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे, यात ईएमआयची सोयही देण्यात आली आहे. तर डिजिटल कॅमेरे आणि लॅपटॉप यांच्यावर 20 टक्क्यांपासून ते 50 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आलेली आहे. हिवाळी कपड्यांवर (Winter wears) 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.
या सेलमध्ये, खास जिम इक्विपमेंटवर 50 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आलेली आहे. यात ट्रेडमील, पोर्टेबल ट्रेडमील, बायसिकल, होम जीम सेटअप, जीम क्लोथ्स आदींवर आकर्षक सवलती आहेत. यासह ब्युटी प्रोडक्ट्सवर 25 ते 40 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.
बँकेकडून काय ऑफर? (What is the offer from the bank?)
या अॅमेझॉनच्या रिपब्लिक डे सेलमध्ये एसबीआयच्या (SBI) कार्डने ईएमआयवर वस्तू घेतल्यास 10 टक्के विशेष सवलत मिळणार आहे. तर, एचडीएफसीच्या (HDFC) डेबिट किंवा क्रेडीट कार्डने सेलमध्ये शॉपिंग केल्यास कोणत्याही वस्तूंच्या किंमतीत आणखी 10 टक्के सूट मिळणार आहे. एचएसबीसीच्या (HSBC) ग्राहकांना सेलमध्ये 8 हजारांपर्यंत शॉपिंग करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
प्राईम मेंबर्ससाठी कोणत्या विशेष सवलती? (Special discounts for Prime Members)
प्राईम मेंबर्सना सेलच्या एक दिवस आधीपासून, म्हणजे 18 तारखेपासून सेलमधील शॉपिंगचा आनंद लुटता येणार आहे. तर, यांना 12 ते 48 तासांमध्ये ऑर्डर डिलिव्हरी मिळणार आहे, तसेच या डिलिव्हरीचे कोणतेही अधिक शुल्क भरावे लागणार नाही आहेत. विशेष म्हणजे, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर अधिक 25 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.