• 08 Jun, 2023 00:34

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Great Summer Sale 2023: बंपर डिस्काउंटसह स्वस्तात खरेदी करा मोबाईल- लॅपटॉप, टीव्ही आणि बरंच काही...

Amazon Great Summer Sale 2023

Amazon Great Summer Sale 2023: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनने (Amazon) खास ग्राहकांसाठी ग्रेट समर सेल सुरु केला आहे. हा सेल 4 मे 2023 पासून ते 8 मे 2023 पर्यंत चालू राहणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि अन्य उत्पादनांची खरेदी करता येणार आहे.

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनने खास ग्राहकांसाठी ग्रेट समर सेल (Amazon Great Summer Sale 2023) सुरु केला आहे. या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वस्तू खरेदी करता येणार आहे. हा सेल 4 मे 2023 पासून ते 8 मे 2023 पर्यंत चालू राहणार आहे. या सेल अंतर्गत ग्राहक टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, किचन गॅजेट्स इ. वस्तूंची खरेदी करू शकतात. याठिकाणी ग्राहकांना नामंकित ब्रँडच्या वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे.

लॅपटॉप आणि टीव्हीवर 'इतका' मिळतोय डिस्काउंट

अमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये (Amazon Great Summer Sale 2023) ग्राहकांना वेगवेगळ्या ब्रँडच्या लॅपटॉपवर जवळपास  40% पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. तसेच सॅमसंग (Samsung), एलजी (LG), गोदरेज (Godrej) आणि हायर (Haier) या नामांकित कंपन्यांच्या स्मार्ट टीव्ही आणि अन्य उत्पादनांवर 60% पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.

या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर 60% डिस्काउंट, 32 इंचाच्या टीव्हीवर 50% डिस्काउंट आणि QLED टीव्हीवर 60 % पर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. मोठ्या आकाराची स्क्रिन असणाऱ्या टीव्हीवर 14,000 रुपयांपर्यंत डिकाउंट, तर OLED टीव्हीवर 50% पर्यंत, 4K टीव्हीवर 55% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे.  

इलेक्ट्रॉनिक्स आणि अन्य उत्पादनांवर किती डिस्काउंट देण्यात येतोय?

लेनोवाच्या (Lenovo) स्लिम बॅकपॅड पीसी एक्सेसिरीजवर जवळपास 75% पर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. हा लॅपटॉप वॉटर रेजिस्टंस, 2 साईड पॉकेट्स, पॅडेड ऍडजस्टेबल शोल्डर स्ट्रिप्स सोबत मिळणार आहे.

तुम्हाला जर ब्रँडेड स्पीकर खरेदी करायचे असतील, तर Boat, Sony, JBL, Zebronics आणि Blaupunkt या कंपन्यांच्या स्पीकरवर 70% पर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.

याशिवाय Samsung, OnePlus, Xiaomi, Realme Narzo, Apple, Techno या ब्रँडच्या मोबाईल फोनवर 40% पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. याशिवाय ठराविक मोबाईल फोनवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. 

प्राईम मेंबरशिप ग्राहकांना मिळणार डिस्काउंट

अमेझॉनची प्राईम मेंबरशिप असणाऱ्या ग्राहकांना आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (ICICI Bank credit card) 15,000 रुपयांपेक्षा जास्तीची सिंगल शॉपिंग केल्यानंतर 250 रुपयांचा त्वरित डिस्काउंट देण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्याकडे कोटक बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड (Kotak Bank debit or credit card) आहे, त्यांना देखील 15,000 रुपयांपेक्षा जास्तीच्या सिंगल शॉपिंगवर 250 रुपयांचा त्वरित डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांना अमेझॉन पे लेटर (Amazon Pay Letter) सुविधे अंतर्गत 60,000 रुपयांपर्यंत क्रेडिट मिळणार आहे. तर 600 रुपयांचा वेलकम बोनस (welcome bonus) जिंकण्याची संधी सुद्धा अमेझॉन देत आहे.

(Source: hindi.moneycontrol.com)