Amazon.com Inc.नं आपल्या कर्मचारी कपातीच्या (layoff) धोरणांतर्गत नव्या यादीत 100 जणांचा समावेश केला. अॅमेझॉन गेम्सचे उपाध्यक्ष क्रिस्टोफ हार्टमन यांनी मंगळवारी कर्मचाऱ्यांना मेमो दिला. अंतर्गत धोरणांचा भाग म्हणून ही कर्मचारी कपात आहे. तर यापुढे जाऊन आम्ही आमच्या अंतर्गत विकासाच्या प्रयत्नांमध्ये गुंतवणूक करणं सुरू ठेवू. आमच्या व्यवसायाचा विस्तार उत्तरोत्तर वाढतच राहील, अशी आशा आहे, असं त्यांनी म्हटलं.
Table of contents [Show]
भांडवल उभारण्यासाठी संघर्ष
अॅमेझॉननं ट्विच स्ट्रीमिंग सेवेवरचा करमणूक कार्यक्रम, क्राउन चॅनेलसह गेमिंगमध्ये भांडवल उभारण्यासाठी संघर्ष केला आहे. ट्विचनं अलीकडेच सुमारे 400 कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं. 2012मध्ये हा विभाग सुरू झाला. तेव्हापासून कंपनीनं काही वरिष्ठ पदं कमी केली आहेत. अॅमेझॉननं एक अंतर्गत गेम विकसित केला. ऑनलाइन रोल-प्लेइंग टायटल न्यू वर्ल्ड हा तो गेम ज्याला सप्टेंबर 2021मध्ये लॉन्च करण्यात आलं. मात्र त्याच्या प्लेअर बेसमध्ये मोठी घसरण झाली. हार्टमॅन म्हणाले, की इरविन, कैलिफोर्नियामध्ये असलेली न्यू वर्ल्ड टीम आपली ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील.
Despite the layoffs, some of Amazon's internal development studios, including the one behind New World, will actually expand. https://t.co/uKsNMUKW38
— GameSpot (@GameSpot) April 5, 2023
सॅन डिएगो स्टुडिओचं काम होणार सुरू
कर्मचारी कपात असूनही सॅन डिएगो स्टुडिओमधल्या अघोषित प्रकल्पांवर काम करणारे कर्मचारी गेमच्या प्री-प्रॉडक्शन टप्प्यात दुप्पट होणार आहेत. हार्टमन म्हणाले. मॉन्ट्रियलमधल्या अॅमेझॉन स्टुडिओच्या अघोषित प्रकल्पावरदेखील काम सुरू आहे. त्याचा विस्तारही होईल. दक्षिण कोरियन ऑनलाइन रोल-प्लेइंग गेम लॉस्ट आर्क पब्लिश करण्यात अॅमेझॉनला यश मिळालंय. हार्टमन म्हणाले, की कंपनी आपलं थर्ड पार्टी पब्लिशिंगचे प्रयत्न वाढवेल. यामध्ये एनसी सॉफ्ट कॉर्प यासह काही करारांचा समावेश आहे.
गेमिंग विभागाची चांगली उलाढाल
कंपनीच्या गेमिंग डिव्हिजननं चांगली उलाढाल आतापर्यंत केलीय. अॅमेझॉन गेम स्टुडिओचे बॉस माइक फ्राझिनी यांनी गेल्या वर्षी पद सोडलं. त्यानंतर हार्टमन आले. सॅन डिएगो कार्यालय चालविण्यास मदत केली ते अनुभवी गेमिंग एक्झिक्युटिव्ह जॉन स्मेडली यांनी जानेवारीमध्ये जाणारअसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे येत्या काळातही कर्मचारी कपात किंवा गळतीचा सामना अॅमेझॉनला करावा लागणार, असंच दिसतंय.
#Amazon laid off more than 100 employees across its gaming divisions that include Prime Gaming, Game Growth & Amazon Games, as part of ongoing layoffs at the company.#layoffs pic.twitter.com/BOqOzUlip1
— IANS (@ians_india) April 5, 2023
मागच्या वर्षभरापासून कर्मचारी कपात
मागच्या वर्षभरापासून कंपनीत अनेकवेळा आणि मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आलीय. जानेवारीत 18,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं. त्यानंतर कंपनीचे शेअर्स घसरले होते. त्यामुळे जवळपास 600 दशलक्ष यूएस डॉलर्सचं नुकसान कंपनीला सोसावं लागलं. मात्र एवढ्यावरच न थांबता पुढच्या महिन्यात आणखी 9,000 कामगारांना कंपनीनं नारळ दिला. छोट्या-मोठ्या कर्मचारी कपातीनंतरही कंपनीला अद्याप अतिरिक्त कामगारांचा बोजा असल्याचं वाटतंय. मागच्या तीन महिन्यात कंपनीनं एकूण 27,000 कर्मचाऱ्यांना काढलं आहे. एडब्लूएस (Amazon Web Services) व ट्विच विभागातल्या 9000 कर्मचाऱ्यांवर नुकतीच बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. यात जाहिरात क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. आता गेमिंगच्या या 100 जणांच्या कपातीनंतर आता कुठल्या विभागात कर्मचाऱ्यांची कपात होते, हे पाहावं लागणार आहे.