अमेझॉन (Amazon) कंपनीच्याच्या भारत, ब्राझील, UAE आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांतील ऑनलाइन व्यवसायातील गुंतवणुकीचे रूपांतर नफ्यात व्हायला वेळ लागेल परंतु अखेरीस कंपनीसाठी मोठी आणि फायदेशीर या देशातील बाजारपेठ कंपनीसाठी फायदेशीर ठरेल, असे त्याचे मुख्य कार्यकारी अँडी जासी यांनी सांगितले.
भारत व उत्तर अमेरिकेतील उद्योग योग्य मार्गावर आहे. तेथील बाजराचे निरीक्षण करून व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही यांच्या व्यापारी धोरणांमध्ये बदल करत आहोत जॅसी यांच्या मतानुसार कंपनी येथे एक मोठा फायदेशीर ई-कॉमर्स व्यवसाय उभारणार आहे.
अंतराष्ट्रीय व्यवसायात झाली घट
कंपनी अमेरिकेबाहेर व्यवसाय करण्यास यशस्वी झाली आहे. मात्र कंपनीच्या अंतराष्ट्रीय विक्रीत मोठी घट झाली आहे. 31 डिसेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत मोठी घट झाली गेल्या वर्षाच्या तुलनेत विक्रीचा दर 8 टक्के घसरून 36 टक्के इतका झाला तसेच कंपनीला 36 टक्के म्हणजेच 2.2 अब्जचा तोटा झाला.
पुढे सीईओ जासी म्हणाले की रशिया-युक्रेन शत्रुत्वामुळे चलनवाढीचा परिणाम युरोपमध्ये झाला. "तुम्ही फक्त उदाहरण म्हणून युरोपकडे पाहिल्यास - महागाई बहुतेक ठिकाणांपेक्षा जास्त आहे आणि युक्रेनमधील युद्धाचा युरोपीयांवर परिणाम अधिक झाला आहे. तसेच, तेथील ऊर्जेच्या किमती आणि दरवाढ अधिक झाली आहे. मात्र हे चित्र कायम स्थिर राहणार नाही." कंपनीने भारतातील सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांसह जागतिक स्तरावर सुमारे 18,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर भारत आणि इतर बाजारपेठांबद्दल सीईओ जासीने हे विधान केले आहे.