Ausper LUV Gift Card: गोल्ड टेक प्लॅटफॉर्म ऑस्पर कंपनीने खास व्हॅलेंटाईन डे (Valentine Day gift) निमित्ताने स्पेशल ऑफर जाहीर केली. कंपनीने ऑस्पर एलयूव्ही हे व्हिसावर चालणारे गिफ्ट कार्ड बाजारात आणले आहे. या कार्डमधील ऑफरद्वारे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला तिच्या आवडीचे सोन्याचे गिफ्ट देऊ शकता. (India's 1st visa-powered card for purchasing gold Jewellery)
A gold-tech platform Ausper: गोल्ड-टेक प्लॅटफॉर्म ऑस्पर हे सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी भारतातील पहिले व्हिसा कार्ड ऑफर करणारी कंपनी आहे. कंपनीने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एक प्री-लोडेड व्हिसा गिफ्ट कार्ड आणले आहे. या कार्डच्या मदतीने तुम्ही कधीही, कोठेही आणि कोणालाही सोने गिफ्ट म्हणून देऊ शकता. या कार्डच्या मदतीने 2 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे सोने गिफ्ट करता येणार आहे. तसेच तुमच्या आवडत्या दागिन्यांच्या ब्रॅण्डमधून वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट निवडण्याची सोय ऑस्पर एलयूव्ही गिफ्ट कार्डमध्ये आहे.
ऑस्पर कार्डवर एक्सक्लुझिव्ह डील्स आणि ऑफर्स
ऑस्पर कार्डच्या मदतीने खरेदी केल्यास ग्राहकांना त्याचा चांगलाच लाभ होऊ शकतो. कारण त्यावर एक्सक्लुझिव्ह डील्स आणि ऑफर्स आहेत. या ऑफर्समधून तुमचा आर्थिक फायदाही होऊ शकतो. ऑस्परने कमीतकमी 20 रुपयांपासून सुरू होणाऱ्या गिफ्टचा यात समावेश केला आहे. त्यामुळे या कार्डवरील ऑफर फक्त महागड्या गिफ्टची खरेदी करणाऱ्यांना लागू आहे, असे नाही. ऑस्परने व्हॅलेंटाईन डे हा प्रेमी युगुलांना संस्मरणीय ठरावा यासाठी सोन्याच्या भेटवस्तुंचा खजिना घेऊन आला आहे.
केव्हाही, कुठेही सोन्याचे गिफ्ट उपलब्ध
ऑस्परने कमीत कमी किमतींपासून सुरू होणाऱ्या गिफ्टचा यामध्ये समावेश केला आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्ताने आपल्या प्रिय व्यक्तीला सोन्याचे गिफ्ट देता यावे. ही भावना लक्षात घेऊन कंपनीने सोन्याच्या गिफ्टचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तसेच कोणत्याही चांगल्या प्रसंगी सोने खरेदी करण्याची भारतीयांची परंपरा आहे. यासाठीही ऑस्परच्या या कार्डचा ग्राहकांना फायदा होऊ शकतो. कारण कमी किमतीत ऐन शुभ मुहूर्तावर सोने मिळणे सोपे नसते.
सोन्याचे वचन, प्रेमाचे वचन
ऑस्पर एलयूव्हीला ग्राहकांसोबत ज्वेलर्स आणि व्यापाऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीला असा विश्वास आहे की, या व्हॅलेंटाइन डे निमित्त आपल्या प्रिय व्यक्तीला 'सोन्याच्या गिफ्टद्वारे प्रेमाचे वचन देण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.