Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Alia Bhatt New Venture: आलिया भट्टने सुरु केला स्वतःचा व्यवसाय, दहाच महिन्यात कमवले 150 कोटी!

aliya bhatt

Image Source : www.fortuneindia.com

Ed-A-Mamma: आलिया भट्टच्या कंपनीने या वर्षी केवळ 10 महिन्यांत 10 पट अधिक व्यवसाय केला असून, या कंपनीचा टर्नओवर सुमारे 150 कोटींचा आहे. ही कंपनी 2-14 वर्षांच्या मुलांसाठी कपडे तयार करते. Myntra या ऑनलाईन कपडे खरेदीच्या ई-कॉमर्स वेबसाईटवर, हा ब्रँड सतत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. या ब्रँडचे कपडे पूर्णतः स्वदेशी बनावटीचे असून पर्यावरणपूरक आहेत.

जबरदस्त बॉलिवूड करिअर गाजवल्यानंतर आता कपूर घराण्याची सून, आलिया भट्ट उद्योग क्षेत्रात उतरली आहे.आलियाने काही महिन्यांपूर्वी एका मुलीला जन्म दिला आहे, त्यामुळे आलिया भट्ट बॉलिवूडवर कमी लक्ष केंद्रित करणार असल्याचं दिसतंय. जबाबदारी वाढल्याने आलिया कुटुंब आणि काम या दोन्हींचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत आलियाने स्वतःचा लहान मुलांच्या कपड्यांच्या ब्रँड एड-ए-मम्मा (Ed-A-Mamma)सुरू केलाय. येत्या काळात या ब्रँडकडे अधिक लक्ष देण्यास ती सुरुवात करणार आहे.

बॉलीवूडच्या दुनियेत आलिया भट्ट या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिचे वडील महेश भट्ट हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक असूनही आलियाने तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये ठसा उमटवला आहे. तिच्या अभिनयाने लोकांच्या हृदयाला स्पर्श केला असून आलियाने बॉलिवूडमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख आणि अस्तित्व निर्माण केले आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेला गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiyawadi) आणि साऊथ सिनेमा आरआरआर(RRR) हे कमालीचे सुपरहिट ठरले होते. काही महिन्यांपूर्वी आलियाने एका मुलीला जन्म दिला आहे.

आलिया भट्ट (Aliya Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) यांचे काही काळापूर्वी लग्न झाले होते आणि नुकतेच दोघेही एका सुंदर मुलीचे पालक बनले आहेत. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव 'राहा'  असे ठेवले आहे.

घर आणि कामाचा समतोल साधणार आलिया

एका मुलीला जन्म दिल्यानंतर आलिया भट्ट बॉलिवूडवर कमी लक्ष केंद्रित करणार असल्याचं दिसतंय. जबाबदारी वाढल्याने आता आलिया कुटुंब आणि काम या दोन्हींचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत आलियाने तिच्या मुलांच्या कपड्यांच्या ब्रँड एड-ए-मम्माकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

आलिया भट्ट बनली व्यावसायिक

आलिया आधीच तिच्या स्वतःच्या वेबसाइटद्वारे या ब्रँडची विक्री करण्यात गुंतलेली आहे. यासोबतच आलियाच्या ब्रँडचे कपडे सर्व प्रमुख ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध आहेत. आलियाच्या कंपनीचे ब्रँडेड कपडे Flipkart, Myntra, First Cry, Amazon इत्यादींवर उपलब्ध आहेत.

दीडशे कोटींहून अधिक किमतीच्या कंपनीची मालक

2021 या वर्षात आलियाच्या कंपनीने बरीच प्रगती केली होती. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, या कंपनीने या वर्षी केवळ 10 महिन्यांत 10 पट अधिक व्यवसाय केला आणि सुमारे 150 कोटींची कंपनी बनली. ही कंपनी 2-14 वर्षांच्या मुलांसाठी कपडे तयार करते. Myntra या ऑनलाईन कपडे खरेदीच्या ई-कॉमर्स वेबसाईटवर, हा ब्रँड सतत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. या ब्रँडचे कपडे पूर्णतः स्वदेशी बनावटीचे असून पर्यावरणपूरक आहेत. आलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, ती जे ठरवते ते पूर्ण करूनच दाखवते.

पूर्णपणे विगन ब्रँड

आलिया सांगते की हा ब्रँड मुलांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम करेल. ऑक्टोबर 2020 मध्ये लाँच झालेल्या या ब्रँडचे देशात आणि परदेशातही खूप कौतुक होत आहे. या ब्रँडने आतापर्यंत 800 प्रकारचे कपडे तयार केले आहेत. सुरुवातीला स्वत:हून काम करू लागलेल्या आलियाच्या कंपनीची किंमत आता 150 कोटी इतकी सांगितली जात आहे.

टीम वर्क सफल!

आलिया भट्टने एका कार्यक्रमात सांगितले की, आमच्या टीमने केलेल्या मेहनतीचे फळ आम्हाला मिळाले आहे आणि लोकांचे जे प्रेम मिळाले आहे, त्यासोबतच आम्ही पुढे जात राहू. ज्याप्रमाणे आमच्या ब्रँडच्या हिवाळा स्पेशल कपड्यांचे कौतुक होते, त्याचप्रमाणे आता उन्हाळ्यात लहान मुलांसाठी लागणाऱ्या कपड्यांच्या निर्मितीसाठी ते तयारी करत आहेत. आलियानेही कबूल केले की ती अजूनही बिझनेस शिकत आहे. आलिया म्हणते की तिचा ब्रँड नैसर्गिक फायबरपासून बनलेला आहे. कंपनीला सेडेक्स, नैतिक व्यापाराचे मानक प्रमाणपत्र मिळाले आहे. याशिवाय अन्य काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र कंपनीला प्राप्त झाले आहे. हा पूर्णपणे शाकाहारी म्हणजेच विगन ब्रँड आहे. या ब्रँडचे कपडे बनवताना कुठल्याही पशु-पक्षांना इजा होणार नाही, त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली असल्याचे तिने म्हटले आहे. उत्कृष्ट गुणवत्तेसह वाजवी किमतीमुळे उत्पादनावर लोकांचा विश्वास प्रस्थापित झाल्याचा दावाही आलियाने केला आहे.