Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ajio Monsoon Sale 2023: अजिओ मान्सून सेलमध्ये करता येईल बजेट फ्रेंडली शॉपिंग; 70 टक्क्यांपर्यंत मिळेल डिस्काउंट!

Ajio Monsoon Sale 2023

Ajio Monsoon Sale 2023: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अजिओचा मान्सून सेल नुकताच सुरू झाला आहे. या सेलमधून तुम्ही होम डेकोरेशनच्या वस्तू, वेगवेगळ्या किचन कटलरी, कपडे, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स इत्यादी वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर करू शकता. कोणत्या वस्तूवर किती डिस्काउंट देण्यात येत आहे, याबद्दल जाणून घेऊयात.

प्रत्येकालाच आपली लाईफस्टाईल आणि घर सुंदर ठेवायची इच्छा असते. परंतू त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. मात्र आज आम्ही तुम्हाला बजेट फ्रेंडली शॉपिंगबद्दल माहिती देणार आहोत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही कमीत कमी किंमतीमध्ये वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करू शकता.

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अजिओचा मान्सून सेल (Ajio Monsoon Sale 2023) नुकताच सुरू झाला आहे. हा सेल 30 जुलै 2023 पर्यंत सुरू राहणार असून या माध्यमातून ग्राहक खरेदी करून मोठा डिस्काउंट मिळवू शकतात. अजिओवरती किचन कटलरी सोबत वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करता येते. ज्यामध्ये कपडे, कॉस्मेटिक्स, होम डेकोरेशनच्या वस्तू यासारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. या मान्सून सेलमध्ये कोणत्या गोष्टीवर किती डिस्काउंट देण्यात येत आहे, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

किचन कटलरीवर मिळेल डिस्काउंट

गृहिणी त्यांचे किचन अधिक आकर्षक आणि मॉडर्न दिसण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करू शकतात. या सेलमधून डायनिंग टेबल, फ्रीज, मायक्रोव्हेव्ह, वॉशिंग मशीन यासारख्या वस्तूंचे कव्हर खरेदी करू शकतात. या कव्हरवर 25 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. तसेच किचनमध्ये डाळी कडधान्य यांसारखे खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या भरण्यांवर 30 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. थ्री इन वन मल्टीस्टीमर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इडली पात्रावर 35% डिस्काउंट मिळत आहे.

जर तुम्हाला तुमच्या घरी उत्तम क्वालिटीचा डिनर सेट आणि कप सेट खरेदी करायचा असेल, तर या सेलमध्ये त्यावर 57% चा डिस्काउंट देण्यात येत आहे. तुमच्या मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी किंवा ऑफिसला नेता येईल, अशा स्वरूपाच्या टिफिनवर 62% चा डिस्काउंट मिळत आहे.

कपडे आणि शूज कलेक्शनवर मिळेल 'इतका' डिस्काउंट

अजिओ मान्सून सेल 2023 मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फॅशन कलेक्शनवर मोठ्या डिस्काउंट मिळणार आहेत. या सेलमध्ये पुरुषांकरिता आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे कपड्यांचे कलेक्शन उपलब्ध आहे. ग्राहकांना डेनिम ब्रँडच्या कलेक्शनवर 40% चा डिस्काउंट देण्यात येत आहे. तर सुपर ड्राय आणि अरमानी एक्सचेंज या ब्रँडवर 50% डिस्काउंट मिळणार आहे. आवासा आणि डी अँड मॅक्स तसेच पुमा यासारख्या ब्रँडवर 30 ते 40% डिस्काउंट देण्यात येत आहे. खास स्त्रियांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अनुभूती ब्रँडवर 55% डिस्काउंट मिळणार आहे.

या मान्सून सेलमधून तुम्ही चपला किंवा शूज खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला क्रॉक्स, पुमा यासारख्या ब्रँडवर 50 ते 60% डिस्काउंट दिला जाणार आहे. तसेच कॅम्पस, वेरोमोडा यासारख्या ब्रँडवर 30 ते 40% डिस्काउंट उपलब्ध आहे.

होम डेकोरेशनच्या साहित्यावरही मिळेल डिस्काउंट

तुम्हाला होम डेकोरेशनचे साहित्य खरेदी करायचे असेल, तर या सेलच्या माध्यमातून तुम्ही मोठा डिस्काउंट मिळवू शकता. खिडक्यांचे पडदे, फोटो फ्रेम्स, भिंतीवरील घड्याळ आणि इतर शोभेच्या वस्तूंवर 40 ते 50% डिस्काउंट दिला जात आहे. तसेच बेड कव्हर, सोफा सेट कव्हर, टेबल लॅम्प यासारख्या वस्तूंवर 45% पर्यंतचा डिस्काउंट देण्यात येत आहे.

फ्री होम डिलिव्हरी आणि कॅशबॅकची सुविधा

अजिओ मान्सून सेलमधून (Ajio Monsoon Sale 2023) कोणत्याही वस्तूची खरेदी केल्यावर ग्राहकांना मोफत डिलिव्हरी दिली जाणार आहे. यावर कोणतेही डिलिव्हर शुल्क आकारले जाणार नाही. तसेच Mobikwik या माध्यमातून ग्राहकांनी 1500 रुपयांपेक्षा जास्तीची खरेदी केल्यावर 10% कॅशबॅक मिळणार आहे.